नवी दिल्ली- तंत्रज्ञान (technology) आणि त्यात होणारे नवनवीन बदल यामुळं जग खुप वेगाने पुढे जात आहे, आधुनिकतेमुळं मानवी जीवनात खूप सुखसुविधा आल्यात. त्यामुळं मानवाचं (Humans) शारीरिक श्रम कमी होऊन त्याची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. दरम्यान, तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि दररोज चांगले होत आहे. एकेकाळी केवळ यंत्र समजले जाणारे रोबोट्स (Robots) आता मानवाच्या म्हणजेच ह्युमनॉइड रोबोट्सच्या जवळ येऊ लागले आहेत. प्रत्येक यंत्र जे मनुष्याचे काम सुलभ करते आणि सॉफ्टवेअरच्या संयोजनासह येते, त्यांना रोबोट म्हणतात. पण काळानुसार रोबोटच्या व्याख्येत बरेच बदल होताना दिसत आहेत.
आगामी काळात रोबोट्स मोलाची भूमिका बजावणार…
हा बदल कागदावर नाही तर लोकांच्या मनात दिसणार आहे. आज जर तुम्ही एखाद्या रोबोट्सबद्दल कुणाला विचारले तर ते त्याची ब्ल्यू प्रिंट माणसाप्रमाणे किंवा प्राण्याप्रमाणे सांगतील. आगामी काळात हे रोबोट्स अनेक प्रकारची कामे करतील. सध्या वैद्यकीय, अंतराळ संशोधन किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या क्षेत्रात रोबोट काम करत असले तरी हे रोबोट्स भविष्यातील जगाचा पाया आहेत. तसेच मानवाची बरीच कामे रोबोट्स करतील असं तज्ज्ञांनी म्हटले आहे.
घरापासून ते युद्धभूमीपर्यंत सर्वंत्र रोबोट्स….
आगामी काळात हे रोबोट्स संरक्षण आणि इतर श्रेणींचाही एक भाग बनू शकतात. आजच्या काळात जर तुम्ही रोबोट्सच्या जगात फिरायला गेलात तर तुम्हाला असे काही रोबोट्स सापडतील, ज्यांच्यावर विश्वास बसणार नाही. जेवण तयार करण्यापासून ते भांडी साफ करण्यापर्यंत रोबोट्स काम करतील. तसेच या रोबोट्स भविष्यात आणखी बदल दिसेल ज्यांची तुम्ही कल्पना केली नसेल.