(फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या काळात आधार कार्ड हे आपले महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आजकाल प्रत्येक कामासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते. आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील आहेत, ज्याच्या मदतीने फसवणूक केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आधार कार्ड लॉक करणे आवश्यक होते. तुम्ही तुमचे आधार कार्ड लॉक केल्यास तुम्हाला एक्सट्रा सिक्योरिटी मिळेल. आधार कार्ड लॉक केल्यांनतर तुमच्या परवानगीशिवाय प्रिंट आणि आयरीस स्कॅनचे व्हेरिफिकेशन करता येईल. हे तुमच्या आधारशी संबंधित ऍक्टिव्हिटीजवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आम्ही तुम्हाला सांगतो की, आधार लॉकची प्रक्रिया सहज करता येते, तुम्ही ते घरबसल्याही करू शकता. हे फिचर ऍक्टिव्ह कसे करायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
आधार बायोमेट्रिक लॉक
तुमच्या फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन आणि फेस डेटाचा गैरवापर होण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधार बायोमेट्रिक लॉक सुरू करण्यात आला आहे. हे एक सुरक्षा वैशिष्ट्य आहे. हे लॉक सक्रिय केल्याने, तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ओळखपत्र पडताळणी, आर्थिक व्यवहार किंवा सिम कार्ड जारी करू शकणार नाही. युजर्स UIDAI पोर्टल किंवा mAadhaar अॅप्लिकेशनद्वारे बायोमेट्रिक्स कधीही लॉक किंवा अनलॉक करू शकतात.
आधार बायोमेट्रिक्स ऑनलाइन कसे लॉक करावे
तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आधार व्हर्च्युअल आयडी (VID) जनरेट करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. इथे लॉग इन करू करून तुम्हाला ते करता येईल, इथे ‘VID जनरेटर’ पर्यायावर क्लिक करू शकता. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
सॅमसंगने AI-पॉवर्ड गॅलॅक्सी बुक 5 सिरीज केली लाँच; जाणून घ्या किंमत आणि अफलातून वैशिष्ट्ये
mAadhaar ॲपवरून आधार बायोमेट्रिक्स कसे लॉक करावे
SMS ने बायोमेट्रिक्स कसे करावे
तुम्हाला तुमचे आधार बायोमेट्रिक्स लॉक करायचे असल्यास, पण तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल, तर तुम्ही एसएमएसच्या मदतीने बायोमेट्रिक्स सहज लॉक करू शकता. यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.