Realme GT 8 Pro स्मार्टफोन सिरीज लाँच! Ricoh GR Optics आणि 7000mAh बॅटरीने सुसज्ज, जाणून घ्या फीचर्स
Realme ची सर्वात तगडी स्मार्टफोन Realme GT 8 सीरीज अखेर चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये Realme GT 8 आणि Realme GT 8 Pro यांचा समावेश आहे. Realme GT 8 Pro स्मार्टफोन कंपनीने Qualcomm च्या फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite Gen 5 SoC आणि R1 X ग्राफिक्स चिपसह लाँच केला आहे.
आता तुमचा प्रत्येक फोटो असणार परफेक्ट! फोटोग्राफीसाठी हे आहेत बेस्ट स्मार्टफोन, आजच करा खरेदी
Realme GT 8 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये डुअल-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. रियलमीचा हा फोन Realme UI 7.0 वर आधारित आहे. कंपनीने दावा केला आहे की, या स्मार्टफोनची पीक ब्राइटनेस 7,000 निट्स आणि रिफ्रेश रेट 144Hz पर्यंत आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेची पिक्सेल डेनसिटी 508 ppi, आणि टच सँपलिंग रेट 3200Hz आहे. हा फोन 100 परसेंट DCI-P3 कलर गॉमट आणि 100 परसेंट sRGB सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. Realme GT 8 सीरीजमधील दोन्ही स्मार्टफोनमधील स्टँडर्ड डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स सारखे आहेत. (फोटो सौजन्य – X)
Realme GT 8 Pro आणि GT 8 हे दोन्ही स्मार्टफोन Qualcomm के Snapdragon 8 Elite Gen 5 आणि Snapdragon 8 Elite चिपसेटसह लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे. यासोबतच प्रो मॉडलमध्ये UFS 4.1 टाइप स्टोरेज, स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये UFS 4.0 स्टोरेज देण्यात आले आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर Realme GT 8 सीरीजमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या प्रो मॉडेलमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.8) Ricoh GR एंटी-ग्लेयर प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. ज्याची फोकल लेंथ 22mm आणि हा 2-एक्सेस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्टसह येतो. यासोबतच या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.6) टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे, जो 120x डिजिटल झूम सपोर्ट करतो. या फोनमध्ये 32-मेगापक्सेल (f/2.4) सेल्फी कॅमेऱ्याचा सपोर्ट देण्यात आला आहे.
Realme GT 8 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. दोन्ही फोनमध्ये 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा आहे. Realme GT 8 सीरीजमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि हा फेशियल रिकॉग्नाइजेशन सपोर्टसह येतो. दोन्ही फोनमध्ये Bluetooth 6, Wi-Fi 7, आणि NFC चा सपोर्ट आहे. Realme च्या नवीनतम स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी आहे. प्रो आणि स्टँडर्ड दोन्ही प्रकार अनुक्रमे 120W आणि 100W चार्जिंग स्पीड देतात.
Realme GT 8 Pro च्या 12जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 50,000 रुपये आहे. 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 4,299 म्हणजेच सुमारे 53,000 रुपये, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 56,000 रुपये, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 4,699 म्हणजेच सुमारे 58,000 रुपये आणि टॉप वेरिएंट 16 रॅम आणि 1टीबी व्हेरिअंटची किंमत CNY 5,199 म्हणजेच सुमारे 64,000 रुपये आहे.