मोबाईल कंपन्यांमध्ये सॅमसंगचे नाव फार लोकप्रिय आहे. सॅमसंग नेहमीच कमी किमतीत चांगल्या फीचर्सचे फोन ग्राहकांसाठी घेऊन येत असतो. त्याच आता सॅमसंगच्या फोनवर सध्या धमाकेदार ऑफर सुरु आहे. यात ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत हा फोन देण्यात येत आहे. हा सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म एमेझॉनवर सुरु आहे. त्यामुळे आता तुम्हालाही नवीन फोन घ्यायचा असल्यास, तुमच्या जुन्या फोनला टाटा बाय बाय करा आणि या नवीन फोनला स्वस्त दारात घेई घेऊन या.
एमेझॉनवर अनेक ब्रँड्सचे फोन यावेळी ऑफरमध्ये विक्रीसाठी आहेत. यात सॅमसंगचा Galaxy M15 हा फोन उत्कृष्ट ऑफर्ससह यूजर्सच्या भेटीला आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन 15,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. या फोनची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे यात 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहे. याच्या वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
[read_also content=”सावधान! व्हाटसऍपवर आलाय नवीन ग्रुप स्कॅम, असे सुरक्षित करा तुमचे अकाउंट https://www.navarashtra.com/technology/whatsapp-new-group-scam-follow-steps-to-secure-your-account-543459.html”]
कसे आहे फीचर
याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर सॅमसंग Galaxy M15 5G मध्ये 6.5-इंच फुल-एचडी + (1,080 × 2,340 पिक्सेल) सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 800 nits ब्राइटनेस आणि व्हिजन बूस्टर आहे. हा फोन ड्युअल सिम (नॅनो) ला सपोर्ट करतो आणि तो Android 13 वर काम करतो.यामध्ये ऑक्टो-कोर चिपसेट आहे. हा मीडियाटेक डायमेंशन 6100+ चिपसेट, 4GB RAM आणि 128GB ऑनबोर्ड स्टोरेजसह मिळू शकतो. हा फोन राखाडी, गडद निळा आणि हलका निळा या रांगांमध्ये उपलब्ध आहे.
50 मेगापिक्सलचा कॅमेरा
सॅमसंगच्या Galaxy M15 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेल शूटर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, या फोनला चार्ज फुल होण्यासाठी 21 तासांपर्यंतचा व्हिडिओ प्लेबॅक वेळ आणि 128 तासांपर्यंतचा ऑडिओ प्लेबॅक वेळ लागतो.