ओटीपी अॅप्स सब्सक्रिप्शनच्या ऑटो पेमुळे हैराण झालात? स्मार्टफोनमधील 'ही' सेटिंग करेल मदत
सध्या ओटीटीवर मोठ्या प्रमाणात टिव्ही शो आणि सिरीज पाहिल्या जातात. कारण आपण आपल्या स्मार्टफोन आणि स्मार्टटिव्ही दोन्ही ठिकाणी ओटीटीची मज्जा घेऊ शकता. त्यामुळे डिश किंवा सेट टॉप बॉक्सला पैसे खर्च करण्यापेक्षा लोकं ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करतात. यामध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी 5, प्राईम व्हिडीओ, जिओ सिनेमा, अशा अनेक ओटीटी अॅप्सवर तुम्हाला टिव्ही शो, चित्रपट आणि सिरीज पाहण्याची संधी मिळते. टिव्हीच्या आधी आपण ह्या ओटीटी अॅप्सवर शो पाहू शकतो. पण यासाठी असणारी सर्वात मोठी अट म्हणजे ओटीपी अॅप्स सब्सक्रिप्शन. ओटीपी अॅप्स सब्सक्रिप्शमध्ये आपल्याला जाहिरातींशिवाय टिव्ही शो आणि चित्रपट पाहण्याची संधी मिळते.
हेदेखील वाचा- Smartwatch Update: स्मार्टवॉचमध्ये किती प्रकारचे सेन्सर असतात? जाणून घ्या
टिव्हीच्या आधी सर्व शो पाहण्यासाठी आपण ओटीपी अॅप्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करतो. पण यासाठी आपल्याला ऑटोपे चा पर्याय निवडावा लागतो. ऑटोमुळे आपण खरेदी केलेल्या सब्सक्रिप्शनचे पैसे दर महिन्याला आपल्या बँक अकाऊंटमधून कापले जातात. पण काहीवेळा आपल्या धावपळीच्या जिवनात आपल्याला ओटीटी अॅप्सवरील टिव्ही शो आणि सिरीज पाहण्याची संधी मिळत नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
त्यामुळे आपण खरेदी केलेले सब्सक्रिप्शन वाया जाते आणि आपण ओटीपी अॅप्सचा वापर केला नाही तरी देखील आपल्या अकाऊंटमधून दर महिन्याला पैसे कापले जातात. अशा परिस्थितीत तुमचे कष्टाचे पैसे वाया जातात. जेव्हा तुमचे सब्सक्रिप्शन ऑटो-रिन्यू मोड असते तेव्हा असे होते. पण आता त्यावर नियंत्रण ठेवणे खूप सोपे झाले आहे. यासाठी तुम्हाला तुमचे सबस्क्रिप्शन मॅन्युअली रद्द करावे लागेल.
हेदेखील वाचा- Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार
तुम्हाला ॲपमध्ये ऑटो पे बंद करण्याचा पर्याय सापडत नसेल, तर ॲपच्या वेबसाइटवर लॉग इन करा आणि तेथून सबस्क्रिप्शन सेटिंग्ज तपासा. तरीही समस्येचे निराकरण न झाल्यास, ॲपच्या कस्टमर केअरसोबत संपर्क साधा. ते तुम्हाला मदत करतील आणि ऑटो पे काढण्यात मदत करतील. तुम्ही तुमच्या बँक खात्यातून किंवा कार्डवरून ऑटो पे सेट केले असल्यास आणि ते ॲपमधून काढले जात नसल्यास, तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि ऑटो पे रद्द करण्याची विनंती करा.