Swiggy ने लाँच केली UPI सेवा (फोटो सौजन्य- pinterest)
करोडो लोक जेवण ऑर्डर करण्यासाठी भारतातील प्रसिद्ध ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy चा वापर करतात. Swiggy च्या मदतीने लोकांच्या घरी कधीही जेवण पोहोचवणे खूप सोपे झाले आहे. Swiggy चा वापर करणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. Swiggy ने आता UPI सेवा देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता तुम्ही Swiggy वरून जेवण ऑर्डर केल्यानंतर पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे. Swiggy च्या नव्या UPI सेवेच्या मदतीने ग्राहकांना पेमेंट करणं अधिक सोपं होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. UPI प्लॅन-इन ॲपमध्ये NPCL च्या एकत्रीकरणामुळे, पेमेंट पूर्वीपेक्षा जलद आणि सोपं होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना एक चांगला अनुभव मिळणार आहे.
हेदेखील वाचा- घरातील सामानासह आता दारूही ऑनलाईन ऑर्डर करता येणार! Swiggy-Zomato लवकरच सुरु करणार नवी सेवा
नव्या UPI सेवेबाबत माहिती देताना Swiggy ने सांगितलं की, आता यूजर्स ॲप न सोडता पेमेंट करू शकतात. यामुळे पेमेंट प्रक्रियाही खूप सोपी होणार आहे. तसेच युजर्स आता त्यांच्या ऑर्डरसाठी फक्त एका स्टेपमध्ये पैसे देऊ शकणार आहेत. ही नवीन सेवा Juspay च्या हायपर UPI प्लगइनच्या मदतीने काम करेल. यामुळे युजर्सना पेमेंट करण्यात खूप मदत होणार आहे. Swiggy वरून जेवण ऑर्डर केल्यानंतर पेमेंट करताना कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही. नवीन पेमेंट फीचरमुळे युजर्सचा इतर ॲप वापरून पेमेंट करण्याचा वेळ वाचणार आहे. जिथे आधी 15-20 सेकंद लागायचे तिथे आता फक्त 5 सेकंदात युजर्सना पेमेंट करता येईल.
तुम्ही Swiggy च्या ॲपवरून ऑर्डर करत असाल तर पेमेंट पेजवर तुम्ही Swiggy UPI चा पर्याय निवडू शकता. जर तुम्ही Swiggy UPI पहिल्यांदा वापरत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे बँक खाते या UPI शी लिंक करावे लागेल. यानंतर पेमेंट करण्यापूर्वी UPI पिन टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय सहज पेमेंट करू शकाल. याशिवाय Swiggy लवकरच IPO लाँच करणार आहे. GST आणि मेट्रो शहरांबाहेरील रेस्टॉरंटमधील पॅकेजिंग शुल्कासह कंपनीने संपूर्ण ऑर्डरच्या किंमतीवर सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. याचा अर्थ असा की अशा मार्केटमध्ये Swiggy शी संबंधित रेस्टॉरंट भागीदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त कमिशन द्यावx लागणार आहे.
हेदेखील वाचा- तुम्हालाही WhatsApp वर वाहतूक दंडाचा मॅसेज आलाय का? सावध राहा नाहीतर होईल लाखोंचं नुकसान
यापूर्वी, लहान शहरांमध्ये, सेवा शुल्क किंवा कमिशन रेस्टॉरंट्सकडून निव्वळ मूल्यावर घेतले जात होते, तर मोठ्या शहरांमध्ये ते आधीच एकूण मूल्यावर घेतलं जात होतं. मात्र आता रेस्टॉरंटमधील पॅकेजिंग शुल्कासह कंपनीने संपूर्ण ऑर्डरच्या किंमतीवर सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. 14 ऑगस्टपासून प्रत्येक ऑर्डरच्या एकूण मूल्यावर सेवा शुल्क आकारले जाईल, असं कंपनीने सांगितलं आहे. याचा सुमारे 1,000 रेस्टॉरंटवर परिणाम होणार आहे.
स्विगी सहसा रेस्टॉरंट्सकडून 17-25% च्या श्रेणीत कमिशन घेते. अलीकडे, स्विगी आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे प्लॅटफॉर्म फी खूप चर्चेत आहेत. प्लॅटफॉर्म फी ही रेस्टॉरंटना स्विगी किंवा झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर घेण्यासाठी भरावी लागणारी रक्कम आहे. हे शुल्क सामान्यतः ऑर्डरच्या एकूण मूल्याची निश्चित टक्केवारी असते.