Jio, Airtel, Vi यूजर्स लक्ष द्या! TRAI चा सिम रिॲक्टिव्हेटबाबत व्हायरल झालेला दावा खोटा, PIB सत्य आणलं समोर
काही दिवसांपूर्वी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) एक नियम व्हायरल झाला होता. या नियमासंबंधित सोशल मीडियावर अनेक पोस्ट देखील व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये सांगण्यात आलं होतं की, दोन सिम असलेल्या लोकांना सिम सक्रिय ठेवण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्यांचं काम केवळ 20 रुपयांत होणार आहे. म्हणजेच ज्या युजर्सकडे 2 सिम आहेत, त्यांना दुसरं सिम सक्रिय ठेवण्यासाठी केवळ 20 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र आता PIB ने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये हा नियम खोटा असल्याचं सांगितलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्वदेशी कंपनीने लाँच केला नवा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन! 5000mAh बॅटरीने सुसज्ज, किंमत केवळ इतकी
खरं तर, अनेक ठिकाणी असे सांगण्यात आले होते की जर एखादे सिम 90 दिवस निष्क्रिय राहिले आणि तरीही त्यात प्रीपेड शिल्लक असेल, तर अतिरिक्त 30 दिवसांसाठी सिम सक्रिय करण्यासाठी 20 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र तुम्ही 20 रुपये खर्च केले नाहीत तर तुमचं सिम डिएक्टिवेट होणार आहे. असंही सांगण्यात आलं होतं की, 120 दिवस पूर्ण झाल्यानंतरही सिम रिॲक्टिव्हेट करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला जाणार आहे. मात्र या काळात सिम ॲक्टिव्हेट केलं नाही तर तो क्रमांक कायमचा लॉक केला जाईल आणि तो दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल. मात्र आता ही बातमी खोटी असल्याचं पीआयबीने सांगितलं आहे. त्यांनी यासंबंधित त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) व्हायरल झालेल्या अशा बातम्यांना दिशाभूल करणारे म्हटले आहे. सोशल मीडियावर करण्यात येत असलेला हा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असा कोणताही नियम नाही.
सोशल मीडिया पर प्रसारित एक समाचार आलेख में दावा किया गया है कि ट्राई ने रिचार्ज नहीं करने पर भी 90 दिनों तक वैध रहने वाले सिम कार्ड के संबंध में नए दिशानिर्देश जारी किए हैं।#PIBFactCheck
✔️यह दावा भ्रामक है pic.twitter.com/C38KnziT0q
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 23, 2025
पीआयबीने या दाव्याचे सत्य तपासले आणि सांगितले की, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका बातमीत असा दावा करण्यात आला आहे की रिचार्ज नाही केले तरीही 90 दिवसांसाठी वैध राहणाऱ्या सिमकार्ड्सबाबत ट्रायने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि अनेक बातम्यांमध्येही हा प्रकार बोलला जात आहे. तर प्रत्यक्षात तसे काहीच नाही. टेलिकॉम कंपन्या अशी कोणतीही सेवा देत नाहीत. ज्यामध्ये सिम सक्रिय ठेवण्याची सुविधा फक्त 20 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. असा कोणताही नियम नसल्याचेही ट्रायने स्पष्ट केले आहे, ज्यामध्ये सिम सक्रिय ठेवण्याची सुविधा फक्त 20 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
अलीकडेच Jio ने 1958 रुपयांचा प्लॅन आणला होता, ज्यामध्ये संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित कॉलिंग आणि 3600 एसएमएस दिले गेले होते. तथापि, ट्रायच्या कारवाईनंतर, जिओने 1748 रुपये किंमतीचा एक नवीन प्लॅन सादर केला आहे. या अपडेटेड प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. यात अजूनही 3600 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगचा समावेश आहे.