डबल धमाका! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Apple चा हा iPhone; 14 मिनिटांत होणार डिलीवरी, काय आहे ऑफर?
तुम्ही देखील अॅपलचा आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने लाँच केलेल्या ऑफरनुसार तुम्ही iPhone 15 अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकता. इतकंच नाही, तर या आयफोनची डिलीव्हरी तुम्हाला केवळ 14 मिनिटांत मिळणार आहे. खरं तर iPhone 15 चे 128GB व्हेरिअंटचे ब्लॅक मॉडेल 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता तुम्ही हा फोन अर्ध्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकता.
Year Ender 2024: 2024 मध्ये लाँच झाले हे टॉप Earbuds, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या फीचर्स
फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये iPhone 15 चे 128GB व्हेरिअंटचे ब्लॅक मॉडेल अगदी कमी किंमतीत उपलब्ध आहे. कंपनीने 2023 मध्ये Apple iPhone 15 लाँच केला होतो. हा आयफोन 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये याची किंमत खूपच कमी आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्हाला हा फोन केवळ 26,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफरसह iPhone 15 च्या 128GB व्हेरिअंटच्या ब्लॅक मॉडेलची किंमत अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमचा जुना आयफोन अपग्रेड करून नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर यापेक्षा दुसरी चांगली संधी नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
iPhone 15 चे 128GB व्हेरिअंट (ब्लॅक मॉडेल) 79,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु आता फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनवर 16 टक्क्यांपर्यंत डिस्काऊं दिलं जात आहे. या डिस्काऊंट ऑफरसह तुम्ही हा फोन केवळ 58,499 रुपयांना खरेदी करू शकता. शिवाय जर तुमच्याकडे तुमचा जुना iPhone 14 Plus असेल तर आयफोन 15 ची किंमत अजून कमी होणार आहे. iPhone 15 च्या 128GB व्हेरिअंटच्या खरेदीवर तुम्ही तुमचा जुना iPhone 14 Plus एक्सचेंज केल्यास, तुम्हाला 31,500 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही iPhone 15 चे 128GB व्हेरिअंट (ब्लॅक मॉडेल) केवळ 26,999 रुपयांना खरेदी करू शकता.
आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे, तुम्हाला या आयफोनची डिलीव्हरी केवळ 14 मिनिटांत मिळणार आहे. पण यासाठी तुमच्याकडून काही जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. तथापि, या सेवेसोबत डिजिटल संरक्षण योजना किंवा उत्पादन एक्सचेंजचा कोणताही पर्याय नसेल.
झोपताना मोबाईल शरीरापासून किती अंतरावर ठेवावा?
iPhone 15 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यामध्ये ऍपलने पूर्वीचे डिझाईन कायम ठेवले आहे, परंतु नॉचच्या जागी डायनॅमिक आयलंड दिले आहे. डिस्प्ले 2000 nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. iPhone 15 च्या मागील पॅनलवर 48MP प्रायमरी सेन्सर आहे. तर 12MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. सेल्फीसाठी 12MP सेंसर देण्यात आला आहे.
यामध्ये Apple A16 Bionic चिपसेट वापरण्यात आला आहे. जे A15 चे अपग्रेड आहे. यात iOS 17 अपडेट आहे, जे iOS 18 अपडेटमध्ये अपग्रेड करण्यायोग्य आहे. iPhone 15 मध्ये 3,349 mAh बॅटरी देण्यात आली आहे.