फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत... लाँच होताच सुरु झाली iQOO च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, पावरफुल चिपसेटने सुसज्ज
iQOO Z11x 5G स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 6GB + 128GB या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होते. तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये आणि 8GB + 256GB वाल्या टॉप व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. अॅक्सिस बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून हे डिव्हाइस खरेदी केल्यास 2,000 रुपयांपर्यंत त्वरित सूट उपलब्ध आहे. नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची पहिली विक्री 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होणार आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. प्रिज्मॅटिक ग्रीन आणि टाइटन ब्लॅक या रंग पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – iQOO)
iQOO Z11x 5G च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.76-इंच LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 382 ppi पिक्सेल डेंसिटी आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये IP68 आणि IP69+ रेटिंग मिळणार आहे.
आयक्यू डिव्हाईस अँड्रॉईड 16-बेस्ड OriginOS 6 वर चालते. फोनला पावर देण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये 4nm ऑक्टा कोर मीडियाटेक 7400 टर्बो चिपसेट आहे. या डिव्हाइसमध्ये 2.6GHz च्या पीक क्लॉक स्पीडसह चार परफॉर्मन्स कोर आणि 2.0GHz वर क्लॉक केलेले चार एफिशिएंसी कोर आहेत. फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. सिक्योरिटीसाठी iQOO Z11x 5G मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.
फोटोग्राफीसाठी iQOO Z11x 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/2.45 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच फोनमध्ये आणखी एक शूटर आहे. मात्र कंपनीने अद्याप त्याबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे.
iQOO Z11x 5G मध्ये 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 44W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.






