Tech Tips: तुमचे खराब फोटोही बनतील एचडी! एडिटिंगसाठी हे बेस्ट AI टूल ठरतील फायदेशीर
एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह होतो. घरी एखादा कार्यक्रम असेल किंवा फिरायला जाणं असो, आपलं सर्वात पहिलं काम म्हणजे फोटो काढणं. फोटोमध्ये आपण त्या क्षणाच्या आठवणी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी आपण काढत असलेले फोटो चांगले येणं खूप गरजेचं असतं. चांगला फोटो क्लिक करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
ChatGPT down: AI चॅटबोट चॅटजीपीटी डाऊन, नेटकरी अस्वस्थ! काय आहे नेमकं कारण?
पण काही वेळा फोटो काढताना अँगल चुकतो तर कधी नको त्या गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये येतात. त्यामुळे आपले फोटो खराब होतात. फोटो खराब झाले तर अनेकजण नाराज होतात, पण फोटो खराब झाल्यानंतर नाराज होण्याची गरज नाही. कारण तुम्ही अगदी काही क्षणातच तुमच्या खराब फोटोला एचडी क्लालिटीमध्ये बदलू शकता. यासाठी तुम्ही काही AI टूल्सचा वापर करू शकता. हे AI टूल्स तुम्हाला फोटो एडिटिंगसाठी मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फोटो एडीट करायचा असेल तर तुमच्यासाठी ॲडोब फोटोशॉप हे बेस्ट AI टूल आहे. या सॉफ्टवेअरमध्ये अशी अनेक टूल्स देण्यात आली आहेत, ज्यामुळे तुमच्या फोटोची सुंदरता वाढवली जाऊ शकते. तुमचा फोटो अधिक आकर्षक होईल. या टूलच्या मदतीने तुम्ही ऑब्जेक्ट हटवणे, रीटचिंग, रीकलरिंग आणि स्टाइलिंग सारखी कामे सहज करू शकता. यात न्यूरल फिल्टर्ससारखी AI-पावर्ड टूल्स देण्यात आली आहेत.
तुम्ही पैसे खर्च न करता फोटो एडिट करता येईल असा मार्ग शोधत असाल, तर अशा लोकांसाठी गुगलचे मॅजिक एडिटर फायद्याचे ठरणार आहे. यामध्ये फोटोमधील नको असलेले भाग काढून टाकण्याची सुविधा देण्यात आली आहे. चांगली गोष्ट म्हणजे हे डिव्हाईस अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोनवर वापरता येते.
फोटोलीप हे देखील AI टूल आहे. यूजर्स हे ॲप ॲपल ॲप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करू शकतात. हे विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे. येथे, तुम्हाला आवडेल असा कोणताही फोटो एडीट करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये दिली आहेत. फोटो एडीट करण्यासाठी, Snapseed, PicsArt, Photo Pad आणि Lightroom Photo/Video Editor सारखे ॲप्स आहेत. रेमिनी हे एआय फोटो इनहान्सर ॲप आहे.
Year Ender 2024: 2024 मध्ये इंस्टाग्रामवर भारतीयांचा जलवा, Meta ने शेअर केल्या खास गोष्टी
एअरब्रश ॲप फोटो अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि डिजिटल आर्ट तयार करण्यासाठी एक पावरफुल टूल आहे. याच्या मदतीने तुम्ही कस्टमाइज ब्रश वापरू शकता, फोटो स्मूथ करू शकता, डाग काढून टाकू शकता आणि तुमचा फोटो एडीट करू शकता. ईजी कंट्रोलसह, ते ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि सेचुरेशन यासारखे अनेक एडिटिंग ऑप्शन देते. याशिवाय, ॲप बॅकग्राउंड ब्लर आणि ऑब्जेक्ट रिमूव्हल सारखी प्रगत वैशिष्ट्ये प्रदान करते. ॲप तुमची क्रिएविटी सुधारण्यात मदत करू शकते.