स्लो झालेला फोन करा फास्ट! ताबडतोब बदला 'ही' सेटिंग, मोबाईल होईल पुन्हा एकदा नवा
अधिकतर अँड्रॉइड फोनमध्ये चालू असलेले बॅकग्राउंड अॅपमुळेही फोन स्लो चालतो. जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तिथे डेव्हलपर ऑप्शन्स सेक्शन आहे. नावावरून असे वाटते की ते फक्त अँड्रॉइड डेव्हलपर्ससाठी आहे. हे काही प्रमाणात खरे आहे, परंतु त्यात अनेक सेटिंग्ज आहेत ज्या सामान्य वापरकर्त्यांसाठी देखील उपयुक्त आहेत. आपण अँड्रॉइड फोनमध्ये कोणत्या सेटिंग बदल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.(फोटो सौजन्य – istock)
Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अॅप, असे असतील फीचर्स
अँड्रॉइडवर मल्टीटास्किंग केल्याने अनेक गोष्टी सोप्या होतात, परंतु त्यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवरही ताण येतो. म्हणून डेव्हलपर मोडमध्ये जा आणि बॅकग्राउंड प्रोसेस लिमिट २ किंवा त्यापेक्षा कमी करा. यामुळे एकाच वेळी अनेक अॅडप्स उघडण्यापासून रोखले जाईल, ज्यामुळे तुमचा फोन सुरळीत चालू राहील.
तुमचा अँड्रॉइड फोन तुमच्या प्रत्येक औक्टिव्हिटी रेकॉर्ड करतो. हे फोनच्या डेव्हलपर्ससाठी उपयुक्त वैशिष्ट्य आहे, परंतु सामान्य वापरकत्यांसाठी फारसे उपयुक्त नाही. अँड्रॉइडमध्ये डिफॉल्टनुसार मोठा बफर आकार तयार होतो. याचा अर्थ हा आकार जेवढा मोठा तेवढी फोनची मेमरी जास्त वापरली जाते आणि त्यामुळे सीपीयूला देखील अधिक काम करावे लागते. तर फोनमधील हा ताण कमी करण्यासाठी लॉगर बफर आकार ६४के किवा २५६ के वर सेट करा.
AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार
तुम्हाला जर तुमच्या फोनच्या बॅटरी लाइफची काळजी नसेल, तर ही सेटिंग तुमच्या फोनचा वापर करणे सोपे करेल. तुमचा फोन हाई रिफ्रेश रेट देत असला तरीही, बैटरी वाचवण्यासाठी अँड्रॉइड अनेकदा तो कमी करतो. हे टाळण्यासाठी, तुम्ही फोर्स पीक रिफ्रेश रेट पर्याय सक्षम करू शकता. यामुळे सोशल मीडियावर स्क्रोल करण्याचा संपूर्ण अनुभव आनंददायी होईल.






