बावनकुळे यांचे अजित पवारांवर भाष्य (फोटो- सोशल मीडिया)
चंद्रशेखर बावनकुळे यांचा अजित पवारांना टोला
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पवारांवर उपरोधिक टीका
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे पुणे दौऱ्यावर
पुणे: भाजपवर टिका करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बदल झाला आहे. हे यापुर्वीच्या अनेक कार्यक्रमांत सांगितले आहे. अशी उपराेधिक टिका महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच पवार यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टिका करून स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बावनकुळे हेे पुण्यात आले हाेते. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परीषदेत पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाजपवर जाेरदार टिका केली जात असल्याकडे लक्ष वेधले. यावर बावनकुळे यांनी पुण्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत, काही प्रकल्पांचे उदघाटन, भुमीपुजन आदी कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे बदलत असल्याचे जाहीरपणे नमूद केले हाेते. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांबराेबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी भाजपचे नेतेही व्यासपीठावर एकत्र हाेते हे आपण पाहीले आहे. असे उत्तर दिले.
सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? भाजपचा बडा नेता स्पष्ट शब्दात म्हणाला फडणवीसांचाच शब्द…
‘‘पुण्याच्या विकास कामांच्या संदर्भातील केंद्र सरकारबराेबर, राज्य सरकार म्हणून झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित हाेते. निवडणुकीच्या काळात अशा टिका केल्या जात असतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्थानिक पातळीवरील भाजपच्या नेत्यांवर टिका करून स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये,’’ असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात विकास झाला नाही या विराेधकांच्या आरोपावर बावनकुळे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘ २०१४ पुर्वीचे पुणे, २०१७ साली महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरचे झालेले बदल आणि विकास कामे याची सत्यता तुम्हाला गुगलवर दिसेल. गुगलवर २०१४ पुर्वीचे आणि सध्याचे पुणे हे पहा मग लक्षात येईल, पुण्यात काय विकास कामे झाली आहेत.
आणखी काय म्हणाले बावनकुळे?
– महारवतनाच्या जमीनीच्या संदर्भातील घारगे समितीचा अहवाल लवकरच
– सदर जमीनीच्या खरेदीची व्यवहार रद्द झाला असला तरी शुल्क हे भरावे लागणार अाहे.
– उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरील सिंचन घाेटाळ्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने त्यावर भाष्य करणे उचित नाही.






