आज सुरु होणार Samsung Unpacked Event, हे प्रोडक्ट्स होणार लाँच; अशी पाहा लाईव्ह स्ट्रिम
22 जानेवारी 2025 रोजी आज Samsung Unpacked Event चं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी प्रमाणे, यंदा देखील सॅमसंग 2025 च्या अनपॅक्ड इव्हेंटसाठी सज्ज झाला आहे. कंपनी दरवर्षी पहिल्या तिमाहीत हा ईव्हेंट आयोजित करते. आज हा ईव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक नवीन प्रोडक्ट्स कंपनी जगासमोर सादर करणार आहे. जगभरातील तंत्रज्ञानप्रेमींच्या नजरा या ईव्हेंटकडे लागल्या आहे. या ईव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत आणि आपण हा ईव्हेंट लाईव्ह कसा पाहू शकतो, याबद्दल जाणून घेऊया.
भारतात OTT-सोशल मीडियाचा वाढता क्रेझ, तब्बल एवढी आहे इंटरनेट युजर्सची संख्या; जाणून घ्या सविस्तर
Galaxy Unpacked इव्हेंट 22 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सुरू होईल. हे कंपनीच्या वेबसाइटवर, अधिकृत YouTube चॅनेलवर आणि सोशल मीडिया हँडल्सवर पाहिले जाऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनी आज Galaxy S25 सीरीज लाँच करणार असल्याची माहिती आहे. या सिरीज अंतर्गत Galaxy S25, Galaxy S25 Plus आणि Galaxy S25 Ultra हे मॉडेल लाँच केले जाऊ शकतात. कंपनीने Galaxy S25 सीरीजचं लाँच कन्फर्म केलं असलं, तरी त्यामध्ये कोणते प्रोडक्ट्स लाँच केले जातील, याबद्दल अद्याप सांगितलं नाही. ईव्हेंटमध्ये Galaxy S25 Slim लाँच करून कंपनी सर्वांना आश्चर्यचकित करू शकते.
Galaxy S25 सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये नवीनतम Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये नवीनतम गॅलेक्सी एआय वैशिष्ट्यांचा समावेश असेल. Galaxy S25 Ultra हा टॉप-एंड फ्लॅगशिप असू शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह 6.8 किंवा 6.9-इंच AMOLED QHD+ पॅनेल असण्याची अपेक्षा आहे. फोनमध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. यात 200MP मेन वाइड कॅमेरा, 50MP 5x टेलीफोटो लेन्स, 3x टेलीफोटो लेन्स आणि अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. बेसलाइन Galaxy S25 आणि S25 Plus बद्दल बोलायचे झाल्यास, या मॉडेल्समध्ये 12GB RAM सह Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याचीही अपेक्षा आहे.
सॅमसंग या इव्हेंटमध्ये OneUI 7 देखील लाँच करू शकतो. डिझाईन आणि सुरक्षेसाठी यामध्ये अनेक अपग्रेड्स देण्यात आले आहेत. यामध्ये, वापरकर्ते कस्टमाइजेबल लॉक स्क्रीन, पुन्हा डिझाइन केलेले कॅमेरा कंट्रोल आणि होम स्क्रीन विजेट्स इत्यादी पाहू शकतात. तसेच थेफ्ट डिटेक्शन लॉक असणे अपेक्षित आहे.
Samsung या ईव्हेंटमध्ये Galaxy Ring 2 लाँच करू शकतो किंवा या इव्हेंटमध्ये त्याच्याशी संबंधित घोषणा करू शकते. कंपनीने नुकतीच पुष्टी केली होती की आता यात दोन नवीन आकारात Galaxy Ring 2 उपलब्ध केली जाणार आहे, जेणेकरुन ते मोठ्या बोटातही सहज बसू शकेल. त्याचा सेन्सर सुधारला गेला आहे आणि ही रिंग आता दीर्घ बॅटरी आयुष्यासह लाँच केली जाणार आहे.
बर्थ-डेथ सर्टिफिकेटसाठी रांगेत थांबण्याची गरज नाही! केवळ एक क्लिक आणि WhatsApp द्वारे होणार काम
प्रोजेक्ट मूहन XR हेडसेट देखील इव्हेंटमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. हे Google च्या Android XR प्लॅटफॉर्मवर विकसित केले गेले आहे. यात इमर्सिव्ह अनुभवासाठी हाय-रिझोल्यूशन डिस्प्ले आणि मल्टी-मॉडल इनपुट सपोर्ट असेल.