फक्त काहीच दिवस बाकी! Jio चा हा प्रीपेड प्लॅन लवकरच होणार बंद, आत्ताच रिचार्ज करा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओ त्यांच्या युजर्सासाठी नेहमीच नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. काही रिचार्ज प्लॅन अतिशय स्वस्त असतात तर काही रिचार्ज प्लॅनची किंमत प्रचंड असते. अलीकडेच जिओने त्यांच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत वाढवली असून त्याची व्हॅलिडीटी देखील कमी करण्यात आली आहे. ज्यामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता कंपनी त्यांचा एक स्पेशल प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद करणार आहे. हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 11 जानेवारीपासून बंद केला जाणार आहे, त्यामुळे या प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तुमच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर हा रिचार्ज प्लॅन बंद केला जाणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
डिसेंबरमध्ये, नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान, टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांच्या युजर्ससाठी आश्चर्यकारक फायद्यांसोबत एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला होता. हा प्लॅन मर्यादित काळासाठी ऑफर करण्यात आला होता आणि वापरकर्त्यांना त्यात बरेच फायदे मिळाले. मात्र आता हा प्लॅन लवकरच बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तुम्हाला या रिचार्ज प्लॅनचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला घाई करावी लागणार आहे.
11 डिसेंबर 2024 रोजी, जिओने त्यांच्या युजर्ससाठी 2025 रुपयांचा स्वस्त प्लॅन लाँच केला. या प्लॅनची व्हॅलिडीटी सुमारे 6 महिन्यांची आहे. हा प्रीपेड प्लॅन मर्यादित काळासाठी लाँच करण्यात आला होता आणि त्यात अनेक विशेष वैशिष्ट्ये होती, ज्यामुळे युजर्सचा बराच फायदा होणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 200 दिवसांची आहे, जी खूप मोठी आहे. हा पहिला जिओ रिचार्ज प्लॅन होता ज्याची व्हॅलिडीटी सहा महिन्यांपेक्षा जास्त होती. म्हणजेच तुम्ही हा प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला 6 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही.
जर तुम्ही जिओ वापरकर्ते असाल आणि दीर्घ व्हॅलिडीटीसह रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुमच्यासाठी 2025 रुपयांचा हा प्लॅन एक चांगला पर्याय आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला 200 दिवस रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. ज्या वापरकर्त्यांना खूप इंटरनेट डेटाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण या प्लॅनमध्ये 200 दिवसांसाठी 500GB डेटा ऑफर केला जात आहे. म्हणजेच दररोज 2.5GB पर्यंत हाय-स्पीड डेटा वापरला जाऊ शकतो.
या Windows यूजर्सवर हॅकर्सची नजर, मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता! सुरक्षेसाठी आत्ताच करा हे काम
पण वेळ कमी आहे! जर तुम्ही अद्याप या रिचार्ज योजनेचा लाभ घेतला नसेल तर ते लवकर करा. हा प्लॅन 11 जानेवारी 2025 पर्यंतच उपलब्ध असेल. यानंतर जिओ हा प्लॅन ऑफर करणार नाही. त्यानंतर तुम्ही मर्यादित पर्यायांमध्ये दीर्घ व्हॅलिडीटीसह प्लॅन खरेदी करू शकता.