Missed Call Scam: अनोळखी नंबरवरून आलेल्या मिस्ड कॉलवर चुकूनही करू नका कॉल बॅक; एक चूक आणि क्षणार्धात व्हाल कंगाल
ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्कॅमर्स सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी नवनवीन मार्गांचा वापर करत आहेत. आता देखील स्कॅमर्सनी सामान्या लोकांकडून पैसे उकळण्यासाठी एक नवीन स्कॅम सुरु केला आहे हा स्कॅम म्हणजे मिस्ड कॉल स्कॅम. या स्कॅममध्ये आपल्या फोनवरून एखाद्या नंबरवरून मिस्ड कॉल दिला जातो आणि आपण जेव्हा या नंबरवर कॉल बॅक करतो तेव्हा प्रीमियम सेवेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जातात. ज्यामुळे आपलं नुकसान होतं.
सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स मिस्ड कॉल स्कॅमचा मार्ग वापरत आहेत. यामध्ये स्कॅमर्स लोकांना अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल करतात. जेव्हा लोक त्या नंबरवर परत कॉल करतात तेव्हा प्रीमियम सेवेच्या नावाखाली त्यांच्याकडून खूप पैसे आकारले जातात. ज्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. खरंतर स्कॅमर तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून अगदी काही सेकंदांसाठी कॉल करतात. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय नंबरवर कॉल करतो तेव्हा आपल्याकडून जास्तीचे पैसे आकरले जातात. आपण काही सोप्या पद्धतींचा वापर करून हा स्कॅम टाळू शकतो.(फोटो सौजन्य – Pinterest)
अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल – स्कॅमर्स लोकांना अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल देतात. बऱ्याचदा हा आंतरराष्ट्रीय क्रमांक असतो. म्हणजे हा नंबर कुठल्यातरी परदेशाचा असू शकतो. जेव्हा या नंबरवर आपण कॉल बॅक करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याकडून विविध सेवांच्या नावाखाली पैसे आकारले जातात.
कॉल बॅक करण्याची उत्सुकता – मिस्ड कॉल पाहिल्यानंतर लोकांना समोरची व्यक्ती कोण आहे ही जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि यासाठी ते त्या नंबरवर परत कॉल करतात.
प्रीमियम रेट कॉल – मिस्ड कॉल आलेल्या नंबरवर परत कॉल करून, प्रीमियम सेवेच्या नावाखाली लोकांकडून पैसे कापले जातात, ज्याचा शुल्क खूप जास्त असतो.
सर्विससाठी सब्सक्रीप्शन घेतात- काही प्रकरणांमध्ये लोक हॅकर्सच्या बोलण्याला भुलून रिंगटोन, गेम किंवा इतर मनोरंजन सेवांसारख्या सर्विससाठी सब्सक्रीप्शन घेतात. ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होतं.
अनोळखी नंबरवर परत कॉल करू नका – जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आला तर त्या नंबरवर परत कॉल करू नका.
प्रीमियम रेट नंबरपासून सावध रहा – जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही प्रीमियम रेट नंबरवर कॉल करत आहात, तर कॉल ताबडतोब डिस्कनेक्ट करा.
पेगाससनंतर आता Paragon चा धोका, हे लोकं हॅकर्सच्या निशाण्यावर? WhatsApp ने इशारा दिला
आंतरराष्ट्रीय नंबर ब्लॉक करा – मिस्ड कॉल स्कॅम टाळण्यासाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय इनकमिंग नंबर ब्लॉक करू शकता.
नंबर ब्लॉक – जर तुम्हाला असा कोणताही कॉल आला तर तुम्ही तो नंबर ब्लॉक करू शकता. यामुळे, भविष्यात तुम्हाला त्या नंबरवरून कोणताही कॉल येणार नाही.