फक्त प्रवासात रस्ताच दाखवत नाही तर.... Google Maps चे 'हे' सीक्रेट फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल थक्क
गुगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही रस्त्यात असणाऱ्या चार्जिंग किंवा फ्यूल स्टेशनची माहिती मिळवू शकणार आहात. गुगल मॅप तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्यांसाठी उपलब्ध असलेल्या चार्जिंग स्टेशनची माहिती देतो. जेव्हा तुम्ही गुगल मॅपमध्ये तुमचे डेस्टिनेशन निवडता, त्याचवेळी तुम्हाला रस्त्यात असणाऱ्या चार्जिंग आणि फ्यूल स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला रस्त्यात गाडीमध्ये फ्युएल टाकण्याची चिंता राहणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
गूगल मॅपमध्ये असे देखील एक फीचर देण्यात आले आहे, जे तुम्हाला नकाशात दिसणाऱ्या स्टोअरमध्ये कोणते प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, याची माहिती देणार आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला रस्त्यात एखाद्या ब्रँडचे स्टोअर दिसले तर गुगल मॅपमध्ये लोकेशन झूम करून तुम्ही त्या स्टोअरमध्ये कोणत्या वस्तू मिळतात, याची माहिती देखील मिळवू शकणार आहात.
गुगल मॅपमध्ये तुम्ही एखाद्या खास ठिकाणाचे मोजाप देखील घेऊ शकणार आहात. यासाठी नाकाशावर राईट क्लिक करा आणि दोन कोणतेही पॉईंट निवडा आणि तुम्ही त्या ठिकाणाचे मोजमाप घेऊ शकणार आहात. तुम्ही माऊस पॉइंटर वापरून क्षेत्रफळ मोजू शकता.
गुगल मॅप्समध्ये तुम्हाला असं देखील एक फीचर मिळणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिसरात शिकणाऱ्या व्यवसायांबद्दल माहिती मिळू शकते. यासाठी तुम्हाला गुगल मॅप्सवर ब्लू ब्रिफकेस ओपन करावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला त्या व्यवसायाचे एक्सेसिबिलिटी ऑप्शन, आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉल, पेमेंट पद्धती आणि ग्राहक सहाय्य पातळी इत्यादींबद्दल माहिती मिळेल.
गुगल मॅप्समध्ये तुम्ही कोणत्याही लोकेशनच्या एक्सेसिबल ठिकाणाची माहिती मिळवू शकणार आहात. यासाठी तुम्हाला गुगल मॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर एक्सेसिबिलिटीवर टॅप करावं लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही एक्सेसिबिलिटी लोकेशनवर टॅप करून फीचर इनेबल करू शकणार आहात.
गुगल मॅप्समध्ये रियल-टाइम ट्रॅफिक अपडेट देखील मिळणार आहे. यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात, त्या ठिकाणाचे नेविगेशन ऑन करावे लागणार आहे आणि ड्राइववाल्या ऑप्शनमध्ये जाऊन रियल-टाइम ट्रॅफिक माहिती मिळवू शकणार आहात.
गुगलने अलीकडेच त्यांच्या सर्व सर्विससाठी एआई फीचर्स इंटिग्रेट करण्यास सुरुवात केली आहे. आता, तुम्हाला गुगल मॅप्समध्ये एआय शिफारशी देखील मिळतील. उदाहरणार्थ, जर पाऊस पडत असेल, तर तुम्हाला गुगल मॅप्समध्ये अल्टर्नेटिव एक्टिविटीसाठी सूचना मिळतील.
Ans: नाही, हे अॅप ट्रॅफिक अपडेट, ठिकाणांची माहिती, रिव्ह्यू, फोटो आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट तपशीलही देते.
Ans: होय, आधी नकाशा डाउनलोड केल्यास इंटरनेटशिवायही वापरता येतो.
Ans: हो, ट्रॅफिक जास्त असल्यास अॅप पर्यायी मार्ग सुचवते.






