1.45-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच झाले नवीन स्मार्टवॉच, 7 दिवस चालणार बॅटरी! जाणून घ्या किंमत
Urban Genesis स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आलं आहे. या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.45-इंच सर्कुलर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे नवीनतम स्मार्टवॉच मेटल चेसिस, स्टेनलेस स्टील ब्लॉक स्ट्रॅप आणि दोन फंक्शनल बटन्ससह लाँच करण्यात आलं आहे. या स्मार्टवॉचमध्ये युजर्स हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ब्लड ऑक्सीजन सॅचुरेशन लेवल (SpO2) आणि स्लीप ट्रॅकर सारख्या फीचर्सचा फायदा घेऊ शकतात.
कंपनीने दावा केला आहे स्मार्टवॉचची बॅटरी सात दिवस चालते. या वॉचमध्ये डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP67 रेटिंग आहे. स्मार्टवॉच बजेट किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. शिवाय स्मार्टवॉचची विक्री देखील सुरु झाली आहे. चला तर मग या स्मार्टवॉचचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या. (फोटो सौजन्य – X)
Urban Genesis स्मार्टवॉच भारतात बजेट फ्रेंडली किंमतीत लाँच करण्यात आलं आहे. या Urban Genesis ची भारतातील किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे स्मार्टवॉच ऑफिशियल ई-स्टोर, Amazon, Flipkart आणि देशातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करू शकतात.
Urban Genesis मध्ये 1.45-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ऑलवेज-ऑन डिस्प्ले फीचरला सपोर्ट करतो. स्क्रीनवर Dynamic Island सारखा बार नोटिफिकेशन्स देण्यात आला आहे. हे Bluetooth 5.3 कनेक्टिविटीसह iOS आणि Android डिवाइसेजला सपोर्ट करते आणि यूजर्सला Bluetooth कॉल्स रिसीव करण्याची सुविधा देखील दिली जाते. स्मार्टवॉचमध्ये अनेक प्रीसेट वर्कआउट मोड्स सारखे ट्रँक वॉकिंग, रनिंग, साइक्लिंग आणि स्किपिंग यांचा समावेश आहे.
Genesis ला 100 हून अधिक वॉच फेसेसने सुसज्ज केलं आहे. हे स्मार्टवॉच युजर्सना Google Assistant किंवा Siri सारखे AI वॉयस असिस्टेंट्सला क्विक अॅक्सेस करण्याची परवानगी देते, जो पेयर्ड डिवाइसेजवर हँड्स-फ्री कमांड्स आणि स्मार्ट कंट्रोल ऑफर करतो. नवीनतम स्मार्टवॉचमध्ये फंक्शनल रोटेटिंग क्राउन आणि एक दूसरा बटन देण्यात आला आहे.
Urban ने दावा केला आहे की, Genesis च्या नवीन स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल, ब्लड प्रेशर आणि स्लीप साइकिल ट्रॅकर्स आहेत. हे स्ट्रेस लेवल मॉनिटर करतो आणि ‘Breathe’ मोडच्या मदतीने यूजर्सला श्वास रेगुलेट करण्यासाठी मदत करतो. वॉच रेगुलर हाइड्रेशन अलर्ट्स देखील देतो. म्हणजेच हा स्मार्टवॉच अनोख्या फीचर्सने सुसज्ज आहे. शिवाय यामध्ये अनेक हेल्थ फीचर्स देखील देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचची किंमत देखील कमी आहे. म्हणजेच जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याची इच्छा असेल तर हे नवीनतम स्मार्टवॉच तुमच्यासाठी बेस्ट आहे.
नवीन स्मार्टवॉचची डिझाईन देखील कमाल आहे. स्मार्टवॉचचा लूक अत्यंत कमाल आहे. स्मार्टवॉचच्या बातमीबाबत असा दावा केला जात आहे की, Urban Genesis सिंगल चार्जवर सात दिवस चालते. यामध्ये IP67 रेटेड डस्ट आणि वाटर-रेजिस्टेंट बिल्ड आहे. वॉच मॅग्नेटिक वायरलेस चार्जिंग सपोर्ट करतो. यामध्ये अनेक बिल्ट-इन गेम्स देखील देण्यात आले आहेत.