OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर... Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी
ओप्पोच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.75 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 1125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. तसेच या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर बेस्ड ColorOS 16 देण्यात आला आहे, ज्यामुळे यूजर्सना लेटेस्ट इंटरफेस अनुभव मिळणार आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर आहे, जो 6nm प्रोसेसवर बेस्ड आहे. यामुळे स्मार्टफोनला स्मूद परफॉर्मंस मिळतो. (फोटो सौजन्य – X)
यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये 4GB आणि 6GB रॅम असे दोन पर्याय आहेत. व्हर्च्युअल रॅमद्वारे 8 जीबी पर्यंत विस्तारासाठी देखील सपोर्ट आहे. या डिव्हाईसमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे माइक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. OPPO K14x 5G या फोनची जाडी 8.61 मिमी आहे आणि मागील पॅनलवर मॅट फिनिश आहे. शिवाय, या फोनला IP64 रेटिंग आहे, ज्यामुळे तो धूळ-प्रतिरोधक आणि पाणी-प्रतिरोधक बनतो.
फोटोग्राफीसाठी ओप्पोच्या या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, जिथे 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा पोर्ट्रेट सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. डिव्हाईस1080p मध्ये फुल HD व्हिडीओ रिकॉर्डिंगला सपोर्ट करतो. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 45W SuperVOOC फास्ट चार्जरसह 6500mAh बॅटरी दिली आहे.
कधी लाँच होणार Free Fire India? गेमर्समध्ये वाढली उत्सुकता, एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर
कंपनीने नवीन स्मार्टफोन प्रिझम व्हायलेट आणि आयसी ब्लू या दोन रंगात लाँच केला आहे. या डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आणि 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आहे. हे डिव्हाइस 16 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट, ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदीसाठी उपलब्ध असेल. लाँच ऑफर्समध्ये 1,500 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंट आणि तीन महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांचा समावेश आहे.






