WhatsApp ला सध्या ‘Arattai ॲप’ कडून भारतात कडवी टक्कर मिळत असली तरी, मार्क झुकरबर्गची कंपनी मेटा आपल्या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये नवनवीन फीचर्स सतत जोडत आहे. आता व्हॉट्सॲपमध्ये इंस्टाग्रामसारखे एक दमदार फीचर येत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोबाइल नंबरशिवाय लोकांना थेट मेसेज करता येणार आहे.
WABetaInfo च्या ताज्या अहवालानुसार, अँड्रॉइड बीटा वर्जन २.२५.२८.१२ मध्ये हे ‘युजरनेम’ फीचर दिसले आहे. हे फीचर आल्यानंतर गोपनीयता (Privacy) आणि संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे.
WhatsApp वर एकापेक्षा एक ढाँसू फिचर्स! Live Photos शेअर करणे आता सोपे
युजरनेम फीचरमध्ये काही निर्बंध (Restrictions) देखील पाहायला मिळू शकतात. रिपोर्टनुसार:
हे फीचर सध्या डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आणि फक्त काही बीटा टेस्टर्ससाठीच उपलब्ध झाले आहे. लवकरच हे फीचर इतर बीटा ग्राहकांसाठी रोल आउट केले जाईल, त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.
दरम्यान, व्हॉट्सॲपमध्ये आणखी एक नवीन सिक्युरिटी फीचर देखील जोडले जात आहे. हे फीचर वापरकर्त्यांना अवांछित फेसबुक लिंक्स (Unwanted Facebook Links) ब्लॉक करण्यास मदत करेल. त्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या प्रोफाइलला पिन (PIN) लावून सुरक्षित करण्याचा पर्याय दिला जाईल.