OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांनी कंपनीचे लेटेस्ट फ्लॅगशिप AI मॉडेल, GPT-4o च्या यशस्वी प्रक्षेपणाचे श्रेय भारताच्या प्रफुल्ल धारिवाल यांना दिले आहे. ऑल्टमनने X वर घोषणा केली आहे, की धारिवालशिवाय ChatGPT4o शक्य झाले नसते. पण, सॅम ऑल्टमनने ज्याचे कौतुक केले होते, तो प्रफुल्ल धारीवाल कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नाही तर या बातमीतून जाणून घेऊयात प्रफुल्ल धारीवाल यांचा संपूर्ण इतिहास.
प्रफुल्ल धारिवाल यांचे गाव?
प्रफुल्ल धारिवाल हे पुण्याचे रहिवासी आहेत. धारिवाल यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक कामगिरीसाठी फार पूर्वीपासून ओळखले जात आहे. 2009 मध्ये त्यांनी भारत सरकारकडून राष्ट्रीय प्रतिभा शोध शिष्यवृत्ती मिळवली. त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले.
धारीवाल हे अभयसातही फार हुशार होते. बारावीच्या प्रज्ञा परीक्षेत त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) विषयांत ३०० पैकी उत्कृष्ट २९५ गुण मिळवले. एवढेच नाही तर प्रवेश परीक्षेतही त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने महाराष्ट्र तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षेत (MT-CET) 190 गुण मिळवले आणि संयुक्त प्रवेश परीक्षेत (JEE-Mains) त्याने 360 पैकी 330 गुण मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले.
[read_also content=”मायक्रोसॉफ्ट व लिंक्डइन २०२४ वर्क ट्रेण्ड इंडेक्समधून निदर्शनास येते की, भारतातील ९२ टक्के हुशार कर्मचारी कामाच्या ठिकाणी एआयचा वापर करतात https://www.navarashtra.com/technology/the-microsoft-and-linkedin-2024-work-trends-index-reveals-that-92-percent-of-indias-smart-workforce-uses-ai-at-work-534474.html”]
शासनाने गौरव केला
धारीवाल यांचा सन्मान करताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) 2013 मध्ये त्यांना वार्षिक आबासाहेब नारायण स्मृती पुरस्काराने सन्मानित केले.
OpenAI चा प्रवास
धारिवाल यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून संगणक विज्ञान (Mathematics) मध्ये पदवी प्राप्त केली. त्याचा OpenAI प्रवास मे 2016 मध्ये रिसर्च इंटर्न म्हणून सुरू झाला. धारिवाल यांच्या प्रमुख कामांमध्ये GPT-3, टेक्स्ट-टू-इमेज प्लॅटफॉर्म DALL-E 2, नाविन्यपूर्ण म्यूजिक जनरेटर जंकबॉक्स आणि रिव्हर्सिबल जनरेटिव्ह मॉडेल ग्लो यांचा समावेश आहे.