Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
गेम दिर्घकाळापर्यंत कोणत्याही ईव्हेंटशिवाय सुरु राहिला तर प्लेअर्सना कंटाळा येऊ शकतो. याच कारणामुळे कंपनी फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन ईव्हेंट्स घेऊन येत असते, जसे दिवाली ईव्हेंट, बूया ईव्हेंट, टॉप-अप ईव्हेंट, कोलॅबरेशन ईव्हेंट इत्यादी. या ईव्हेंटमुळे गेममध्ये नवीन उत्साह येतो आणि प्लेअर्सना गेममध्ये नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची देखील संधी मिळते. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेक प्लेअर्स गेममध्ये डायमंड खर्च करत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी ईव्हेंट अतिशय फायदेशीर ठरतात. कारण प्लेअर्स ईव्हेंटच्या मदतीने अनेक रिवॉर्ड्स फ्रीमध्ये जिंकू शकतात. जसे फ्री गन स्किन, बंडल, इमोट, वॉलपेपर, लूट बॉक्स, आणि कॅरेक्टर इत्यादी. ईव्हेंटच्या मदतीने प्लेअर्स पैसे किंवा डायमंड खर्च न करता देखील त्यांचे इन-गेम कलेक्शन वाढवू शकतात.
फ्री फायर मॅक्समध्ये जेव्हा एखाद्या नवीन फीचर, मोड किंवा कॅरेक्टरचा समावेश केला जातो, अशावेळी प्लेअर्ससाठी स्पेशल ईव्हेंटचे आयोजन केले जाते. हा ईव्हेंट नवीन फीचर, मोड किंवा कॅरेक्टर्सना समजण्यासाठी आयोजित केला जातो. त्यामुळे गेम खेळताना कोणतीही अडचण येत नाही.
ईव्हेंटमध्ये रँकिंग, टास्क, मिशन आणि चॅलेज यांचा समावेश असतो. प्लेअर्स हे टास्क पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, ज्यामुळे गेममधील स्पर्धा अधिक तीव्र होते.
Tech Tips: स्मार्टवॉच घालूनच झोपताय? 90 टक्के लोकं करतात ही मोठी चूक, सत्य वाचून तुम्हीही घाबराल
जेव्हा एखादा मोठा ईव्हेंट आयोजित केला जातो तेव्हा संपूर्ण गेम कम्युनिटी एकत्र सक्रिय होते. प्लेअर्स त्यांच्या मित्रांना आमंत्रण देतात, यासोबतच मित्रांसोबत मिळून मिशन पूर्ण करतात आणि नवीन रिवॉर्ड्स शेअर करतात. यामुळे कम्युनिटी मजबूत होते.
Garena सहसा चित्रपट, स्पोर्ट्स, सुपरहीरो आणि सेलेब्रिटीजसह कोलॅब ईव्हेंट आयोजित करते. यामुळे गेमची लोकप्रियता अधिक वाढते आणि ब्रँड व्हॅल्यू देखील वाढते. यासोबतच प्लेअर्सना नवीन अनुभव देखील मिळतो.






