Vivo X300 vs OnePlus 15: तुम्ही कोणाची निवड करणार? एकीकडे ढासू कॅमेरा, दुसरीकडे दमदार बॅटरी! तुमच्यासाठी योग्य कोण?
लेटेस्ट Vivo X300 मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉल्यूशन 1216×2640 पिक्सेल आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्ले HDR सपोर्ट देखील ऑफर करतो. तर OnePlus 15 मध्ये 6.78-इंच QHD+ AMOLED आहे, जो 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट ऑफर करतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
विवोच्या स्मार्टफोनमध्ये परफॉर्मससाठी MediaTek Dimensity 9500 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 16GB LPDDR5x रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी आणि इमेजिंग परफॉर्मेंस इनहान्स करण्यासाठी VS1 आणि V3+ चिप दिली आहे. फोन OriginOS 6 वाल्या Android 16 वर आधारित आहे. तर वनप्लस स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर, Adreno 840 GPU, 16GB LPDDR5X Ultra+ रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 16 वर बेस्ड OxygenOS 16 वर चालतो.
Vivo X300 स्मार्टफोन फोटोग्राफी लवर्ससाठी एक उत्तम ऑप्शन ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ZEISS ब्रांडिंगवाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. याचा मुख्य कॅमेरा 200MP (OIS) आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 50MP चा वाइड-अँगल आणि 50MP चा टेलीफोटो लेंस (3x जूम) देण्यात आले आहे. सेल्फीसाठी या डिव्हाईसमध्ये 50MP कॅमेरा आहे. OnePlus 15 स्मार्टफोनमध्ये तीन 50MP कॅमेरे देण्यात आले आहेत (Sony IMX906 मेन सेंसर + Samsung JN5 टेलीफोटो 3.5x झूम + OV50D अल्ट्रावाइड). या स्मार्टफोनची खासियत व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. हा डिव्हाईस 8K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. याचा फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे जो 4K 60fps व्हिडीओला सपोर्ट करतो.
OnePlus 15 मध्ये 7,300mAh ची मोठी सिलिकॉन-कार्बन बॅटरी दिली आहे, जी कदाचितच दुसऱ्या फ्लॅगशिपमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 120W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. डिव्हाईस केवळ 39 मिनिटांत फुल चार्ज करू शकतो. Vivo X300 मध्ये 6,040mAh बॅटरी दिली आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus च्या तुलनेत ही बॅटरी छोटी आहे.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 6 आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर आहे. OnePlus 15 जास्त रफ-एंड-टफ आहे. यामध्ये IP66+IP68+IP69+IP69K रेटिंग आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन पाणी आणि धुळीपासून अधिक सुरक्षित आहे. तसेच Vivo X300 मध्ये IP68/IP69 रेटिंग आहे.
Vivo X300 च्या 12GB+256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या डिव्हाईसची विक्री 10 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. OnePlus 15 च्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 72,999 रुपये आहे.
ज्यांना फोटोग्रीफासाठी स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा आहे, असे लोकं Vivo X300 ची निवड करू शकतात. ज्यांना गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि रफ-एंड-टफ स्मार्टफोन पाहिजे आहे, असे लोकं OnePlus 15 ची निवड करू शकतात.
Ans: Vivo X300 हे कॅमेरासाठी ओळखले जाते, तर OnePlus 15 परफॉर्मन्स आणि सॉफ्टवेअर अनुभवासाठी फेमस आहे.
Ans: Vivo X300 मध्ये IMX flagship सेंसरसह झूम आणि नाईट फोटोग्राफी जास्त जबरदस्त मिळते.
Ans: OnePlus 15 मध्ये ऑप्टिमाइज्ड OxygenOS आणि स्मूथ परफॉर्मन्स असल्यामुळे गेमिंगमध्ये तो जास्त बेस्ट ठरतो.






