फक्त फोटो किंवा व्हिडीओशुट करण्यासाठीच i Phone नाही तर त्याचे अनेक छुपे फिचर्स देखील आहेत. जागाला वेड लावणाऱ्या या i Phone ला बाजूच्या कॉर्नरमध्ये एक छोटी रेघ आहे. या आडव्या रेषेचं मोठं महत्व आहे.
जर तुम्हीसुद्धा i Phone वापरत असाल किंवा तुम्हाला देखील i Phoneचं वेड असेल तर ही माहिती तुम्हाला माहित असायलाच पाहिजे. i Phone च्या बाजूच्या फ्रेमवर एक रेषा पाहिली असेल. तर तुम्ही त्याच्या बाजूच्या फ्रेमवर एक रेषा पाहिली असेल. जर तुम्ही आयफोन व्यतिरिक्त ॲपलचे सेल्युलर कनेक्टिव्हिटी असलेले आयपॅड आणि ॲपल वॉच वापरत असाल, तर तुम्ही त्या डिव्हाईसवर अशा रेषा पाहिल्या असतील.बहुतेक लोकांना वाटते की हा डिझाइनचाच एक भाग आहे, पण त्यामागे तांत्रिक कारण आहे. या रेषा आयफोनच्या डिझाइनचा भाग नाहीत तर एका महत्त्वाच्या भागाला कार्य करू देण्यासाठी त्या डिझाइन केलेल्या आहेत.
आडव्या रेषेचा वापर काय ?
आता प्रश्न हा उरतो की, या आडव्या रेषेचा उपयोग होतो तरी कसा ? तर ही आडवी रेष अँटेना म्हणून काम करते. याच अँटेनामुळे आयफोनचे ब्लूटूथ, वायफाय आणि 5G चिप्स डिजिटल कनेक्ट होतात. या आडव्या रेषेत तुमच्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधतात. उदा, i Phone 17 promax मध्ये कॅमेरा आयलँडच्या खाली एक अँटेना लाइन आहे. त्याचा वापर कनेक्टीव्हिटीसाठी होतो.
बऱ्याच स्मार्टफोनमध्ये मेटलचा समावेश असतो. आता मेटलमुळे होतं काय तर सिग्नलला अडथळा निर्माण होतो.त्यामुळे नेटवर्क, Wi-Fi, Bluetooth सिग्नल नीट येत नाही. म्हणून या रेषांमध्ये प्लास्टिक किंवा इन्सुलेट मटेरियल वापरले जाते, जे सिग्नल बाहेर-आत जाऊ देतात.या रेषांमध्ये विशेष प्रकारचे इन्सुलेट मटेरियल वापरलेले असते, जे सिग्नलला अडथळा येऊ देत नाही.लेटेस्ट मॉडेल्सप्रमाणे, जुन्या आयफोन्समध्येही अँटेनाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. i Phone 6 बद्दल बोलायचे झाल्यास, मागील कॅमेरा आणि फोनचा खालचा भाग यांना वेगळी करणारी एक रेषा होती.तर आयफोन 8 ते आयफोन 16 पर्यंतच्या मॉडेल्समध्ये स्टेनलेस स्टील आणि टायटॅनियम फिनिशमुळे त्याची व्हिजीबिलीटी किंचित कमी झाली, परंतु अँटेना लाइन आयफोनसोबतच राहिली.
i Phone साठीची अँटेना लाइन जास्त महत्त्वाची असते. खरं तर, सिग्नल जाण्यासाठी त्याच्या धातूच्या बॉडीमध्ये कुठेतरी एक फट असणे आवश्यक असते.ही तार ब्रेकप्रमाणे काम करते, ज्यामुळे रेडिओ सिग्नल तिच्यामधून जाऊ शकतात. तिच्याशिवाय, सिग्नलच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.धातूच्या चौकटींमुळे रेडिओ फ्रिक्वेन्सी सिग्नल कमकुवत होण्याची शक्यता असते. ही पॉलिमर आणि कंपोझिटवर आधारित लाइन धातूच्या चौकटीत एक खिडकी तयार करते, ज्यामुळे सिग्नल कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यातून जाऊ शकतात.






