WWDC 2025: iPhone बनणार आता सुपरफास्ट, हे आहेत iOS 26 चे टॉप 7 फीचर्स! वाचा सविस्तर
अॅप्पलने WWDC 2025 ईव्हेंटमध्ये त्यांच्या काही ठरावीक आयफोन्ससाठी iOS 26 रिलीज केलं आहे. यामध्ये iPhone 16e, iPhone 16 and 16 Plus, iPhone 16 Pro and 16 Pro Max ,iPhone 15 and 15 Plus, iPhone 15 Pro and 15 Pro Max, iPhone 14 and 14 Plus, iPhone 14 Pro and 14 Pro Max ,iPhone 13 and 13 mini ,iPhone 13 Pro and 13 Pro Max ,iPhone 12 and 12 mini ,iPhone 12 Pro and 12 Pro Max, iPhone 11, iPhone 11 Pro and 11 Pro Max आणि iPhone SE (2nd जेनरेशन आणि नवीन मॉडेल) यांचा समावेश आहे.
WWDC 2025 : Liquid Glass डिझाईन Apple ने सादर केला iOS 26! लूक आणि नावासह झाले हे बदल
या यादीमध्ये जर तुमच्या आयफोनचा देखील समावेश असेल तर अभिनंदन. तुमच्या आयफोनला देखील iOS 26 सपोर्ट मिळणार आहे. iOS 26 मुळे युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे. iOS 26 च्या टॉप 7 फीचर्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
यावेळी iOS मध्ये अॅप्पलने AI पूर्णपणे अपडेट केलं आहे आणि त्यांच्या Apple Intelligence ला पूर्वीपेक्षा अधिक चांगले बनवलं आहे. कंपनीने यामध्ये फाउंडेशन मॉडेलचा वापर करून पर्सनल काम स्मार्ट आणि फास्ट बनवलं आहे. जसं की, Summaries, कंटेंट क्रिएशन आणि स्मार्ट रिप्लाय आता पूर्वीपेक्षा अधिक चांगले झाले आहे.
रीयल-टाइम Translation आता पूर्वीपेक्षा अधिक पावरफुल झाले आहे. Live ट्रांसलेशन फीचर आता तुम्हाला कोणतीही भाषा समजण्यास आणि ट्रांसलेट करण्यासाठी मदत करणार आहे. जर तुमचा कोणी मित्र दुसऱ्या भाषेत बोलत असेल तर या फीचरच्या मदतीने तुम्ही रियल टाइम ट्रांसलेशन करू शकणार आहात.
स्क्रीनशॉट आता केवळ ईमेज कॅप्चर करण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही. तर आता हे एक स्मार्ट असिस्टेंट बनलं आहे. आईओएस तुमच्या स्क्रीनशॉटमधील डेट, इवेंट, लिंक आणि टेक्स्ट समजून घेईल आणि ते कुठे सेव्ह करायचे याबाबत देखील युजर्सना सल्ला देणार आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला स्क्रीनशॉटच्या अगदी खाली कॅलेंडरमध्ये जोडण्याचा पर्याय देखील दिला जाणार आहे.
12GB रॅम आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Vivo Y300c, किंमत 17 हजारांहून कमी! असे आहेत स्पेसिफिकेशन्स
मेसेजिंग एक्सपीरियंस अधिक मजेदार बनवण्यासाठी आता कंपनीने यामध्ये बॅकग्राउंड आणि पोलचा ऑप्शन देखील जोडला आहे. आता तुम्ही मेसेजमध्येच तुमच्या मित्रांसोबत वोटिंग करू शकणार आहात. यामुळे तुमचे मेसेज अधिक स्टायलिश दिसणार आहेत.
लॉक स्क्रीन आता तुमच्या सराउंडिंग आणि वेळेनुसार एडाप्ट केली जाणार आहे. दिवस असो किंवा रात्र स्क्रीन तुमच्या मूडनुसार बदलणार आहे. ज्यामुळे लॉक स्क्रीन आणखी चांगली होईल.
जगभरातील लाखो युजर्स स्कॅम आणि फ्रॉड मेसेजमुळे प्रत्येक स्मार्टफोन त्रस्त आहे. तुम्हाला फक्त संबंधित कॉल्स मिळतील. परंतु आता iOS ची नवीन स्क्रीन आपोआप अज्ञात कॉल्स आणि संदेश फिल्टर करेल, तुम्हाला फक्त संबंधित कॉल्स मिळतील.
जेव्हा तुम्ही कॉल होल्डवर ठेवता तेव्हा हे फीचर आपोआप लाइनचे निरीक्षण करते आणि एजंट लाइनवर येताच तुम्हाला नोटिफाई करते. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि कॉलिंगचा चांगला अनुभव मिळेल.