Sunetra Pawar New Deputy CM: एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला;
२८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियोजित २२ प्रचार सभा रद्द केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आता केवळ स्थानिक नेते आणि पदाधिकारीच प्रचाराची धुरा सांभाळतील, तर स्वतः देवेंद्र फडणवीस कोणत्याही जाहीर सभेत सहभागी होणार नाहीत, असेही जाहीर करण्यात आले आहे. (Devendra Fadnavis will not campaign in the Zilla Parishad elections 2026)
राज्यात येत्या ७ फेब्रुवारी 2026 रोजी 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या ७ दिवसांत २२ प्रचारसभा होणार होत्या. पण फडणवीस यांनी आता एकही सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे देवेंद्र फडणवीसांनी कोणत्याही सभा घेणार नसल्याचे जाहीर केलं आहे. (Zilla Parishad Election 2026)
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे, तर मतमोजणीची प्रक्रिया देखील बदलून ९ फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.






