स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसरने चालवला जातो. डिव्हाइसमध्ये ७.६-इंच इनर डिस्प्ले आणि ६.३-इंच आउटर डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले डायनॅमिक एमोलेड २एक्स पॅनेल आहेत जे १२० हर्ट्झ पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,४०० एमएएच बॅटरी देखील आहे.
कॅमेरा स्पेसिफिकेशन
गॅलेक्सी झेड फोल्ड ६ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा ओआयएससह आणि १२ एमपी अल्ट्रावाइड लेन्स आहे. फोनमध्ये १० एमपी टेलिफोटो लेन्स देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, डिव्हाइसमध्ये १० एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
किंमत आणि ऑफर्स काय?
सॅमसंगने भारतात सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन १,६४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केला. मात्र आता हा फोन तुम्ही सध्या Amazon वरून फक्त १,०९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजे फोनवर सध्या ५५,००० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. एवढेच नाही तर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि स्कॅपिया फेडरल बँक क्रेडिट कार्ड ईएमआय पर्यायांसह हा फोन १,५०० रुपयांपर्यंत सूटसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला आणखी मोठी सवलत पाहिजे असेल तर तुम्ही आपला जुना फोन एक्सचेंज करू शकता. ज्यामुळे तुम्हाला एक्सचेंज व्हॅल्यूमध्ये ४२,००० रुपयांपर्यंत मिळू शकते.
एअरटेलच्या 36 कोटी ग्राहकांसाठी मोठी भेट; Adobe Express Premium वर्षभर मोफत
Ans: भारतात या फोनची सुरुवातीची किंमत ₹1,64,999 रुपये आहे.
Ans: Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर.
Ans: मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि समोर 10MP सेल्फी कॅमेरा आहे.






