अहिल्यानगर महापालिका शहरातील मतदार यादीत थेट श्रीगोंद्यातील मतदारांचा समावेश केला आहे. अहिल्यानगरमधील मतदार यादीत श्रीगोंद्यातील ४३७१ मतदार जोडण्यात आले आहेत.
नगरपरिषदेच्या निवडणुकांवरुन अनेक राज्यातील राजकीय पक्षांमध्ये अनेक मतमतांतरे पाहायला मिळाली. अशातच सातारा नगरपरिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांनी मतपेट्या ठेवलेल्या गोदामाला सील करण्याच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतलाय.
मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आले आणि रात्रीच स्ट्रॉग रूममध्ये हलवून ठेवण्यात आले.
वेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार हे विरोधात असताना अधिवेशनासंदर्भात भूमिका मांडत होते. अधिवेशन जायचं होतं तर बजेट अधिवेशन नागपुरात घ्या? तोंडाला पान पुसण्यासाठी हे अधिवेशन घ्यायचं.
Local Body Election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात पोलीसांचा मोठा फौजफाटा सज्ज झाला आहे. कर्जत नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये शिंदेसेना आणि भाजपा या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायाला मिळालं.
एक दिवसाची मुदतवाढ दिल्याने प्रत्यक्ष मतदानाचा एक दिवसाआधीपर्यंत प्रचार करता येईल. मात्र, सर्वाधिक लक्ष रविवार या सुटीचा दिवशी असून, खऱ्या अर्थात सर्वच उमेदवारांसाठी तो 'सुपर संडे' असणार आहे.
जिल्ह्यातील ५ नगरपरिषद जागांना स्थगिती देण्यात आली आहे. गडचांदूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ व मधून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जाच्या छाननीदरम्यान त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले.
भद्रावती नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार सुनील नामोजवार यांच्यात काट्याची लढत होईल. राष्ट्रीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.
एकंदरीत, पक्षांची चिन्हे बाजूला पडून स्थानिक आघाड्यांची मोहर उमटलेली ही निवडणूक पूर्णपणे गावकुसातील राजकारणाच्या नव्या समीकरणांची कहाणीने निवडणूक रंगणार आहे.