निवडणुका(फोटो-सोशल मीडिया)
आदर्श आचारसंहितेचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन होऊ नये, यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, तसेच उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील अनधिकृत फलक, बॅनर्स, पोस्टर्स आणि अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून शहर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यावर भर देण्यात आला.
दि. २३ डिसेंबर २०२५ पासून छापील नामनिर्देशन पत्रांचे वितरण व स्वीकार सुरू होणार असून, त्यासाठी दि. २० डिसेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक स्टेशनरी व साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये १७ लाख मतदार बजावणार हक्क
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती पालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम अधिसूचनेनुसार शहरात एकूण ३२ प्रभाग असून, एकूण १२८ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देत एकूण जागांपैकी ५० टक्के (६४ जागा) महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण १७ लाख १३ हजार ८९१ मतदार असून, यामध्ये पुरुषांचे पारडे जड आहे. मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी mahasecvoterlist.in या संकेतस्थळावर ‘Search name in voter list’ ही सुविधा देण्यात आली आहे.
हेही वाचा : IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याआधी भारताला झटका! संघातील स्टार खेळाडू संघाबाहेर; कारण आले समोर






