Baramati News: बारामती येथील 'त्या' उमेदवारांना उच्च न्यायालयाचा दणका; अर्ज स्वीकारण्याचा निर्णय ठरविला रद्द
आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला
बारामतीच्या न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करत त्यांचे अर्ज दाखल करून घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सतीश फाळके व अॅड. अविनाश गायकवाड यांचे अर्ज दाखल झाले. मात्र, निवडणूक आयोगाने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत, बारामतीच्या न्यायालयाच्या कार्यकक्षेबाहेरचे हे प्रकरण आहे, असे नमूद करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. बुधवारी (दि १०) मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक निर्णय, अधिकाऱ्यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी युक्तिवाद करत न्यायालयाने घेतलेला हा निर्णय त्यांच्या अधिकारकक्षेबाहेरील असल्याचे नमूद केले.
न्यायालयानेही ही भूमिका मान्य करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाच रद्द ठरविली. त्यामुळे दाखल झालेले दोन्ही अर्ज आता रद्द ठरणार आहेत, उर्वरित निवडणुकीची प्रक्रीया पूर्वी ठरल्यानुसारच होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान सतीश फाळके व अॅड अविनाश गायकवाड यांनी बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
मांढरे व सय्यद यांच्या वतीने अॅड. अक्षय महाडिक यांनी बाजू मांडली. दरम्यान २० डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून, २१ रोजी मतमोजणी होणार आहे.






