काशिमीरा चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या दुरुस्ती व संभाव्य स्थलांतराच्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण तापले असून भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला आहे
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, परिवहन विभागाने खास करून मराठी न बोलणाऱ्या चालकांना "व्यावहारिक मराठी" शिकवण्यासाठी एक मार्गदर्शिका पुस्तक तयार केली आहे.
राज्यात ऑटो-रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक करण्याचा निर्णय लागू करण्यात आला आहे. एसटी ‘लालपरी’चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून Riteish Deshmukh आणि Genelia D'Souza यांची नियुक्ती करण्यात आली.
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
मिरा-भाईंदरच्या राजकारणात सध्या भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर आला असून, आमदार नरेंद्र मेहता आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
बस स्थानकाचा परिसर आणि स्वच्छतागृहे केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी स्वच्छ राहिली पाहिजेत. त्यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे अनिवार्य असेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.या दरम्यान त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसराला अचानक भेट देत बस स्थानकातील कॅन्टीन आणि स्वच्छतागृहाचे पाहणी केली.
मिरा-भाईंदर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शहरात नागरिकांच्या तक्रारींचे थेट निवारण करण्यासाठी आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य लोकदरबाराचे आयोजन करण्यात आले होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश प्रताप सरनाईक यांनी आमदार नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहिले त्यात त्यांनी मेहता यांनी केलेल्या एका युट्युब चॅनलवरच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली…
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
मीरा रोड घोडबंदर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी २ कोटींचा निधी मंजूर करत कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा परवान्यांची व्यापक फेरतपासणी करण्याचे आदेश दिले असून, या प्रक्रियेत चालकांना मराठी येते का याचीही पडताळणी केली जाणार आहे.
ई-चलानच्या मुद्द्यावरून राज्यातील परिवहन क्षेत्रात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. बस, ट्रक, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा यांसारख्या विविध परिवहन संघटनांनी ई-चलानमध्ये दिलासा देण्याच्या मागणीसाठी अलीकडे आंदोलन छेडले होते.
मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम २०१९ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६७ (३) अंतर्गत राज्य सरकारांना प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे अर्थ खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ फरकासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे २४ फेब्रुवारीचे 'बोंब मारो' आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.
MSRTC News: आगार व्यवस्थापकांनी अशा प्रकरणांची स्वतः खात्री करून संबंधित चालकांविरुद्ध नियमानुसार तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.