फोटो सौजन्य - Social Media
रितेशने या मुद्द्यावर अखेर चुप्पी तोडली आहे. रितेश म्हणाला की, “महाराष्ट्र राज्यात मराठी भाषा ही अनिवार्यच असली पाहिजे. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी सक्तीने बोलली गेली पाहिजे त्याचप्रकारे आपण जेव्हा परराज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा सक्तीने बोलली पाहिजे.” रितेश म्हणतो की,”राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा हा निर्णय एकदम योग्य आहे.”
या दरम्यान, रितेशने त्याच्या लहानपणीच्या आठवणीही सांगितल्या आहेत. रितेश म्हणतो की, “लहानपणी साहेब (दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख) पुण्याकडे किंवा लातूरमध्ये ST नेच प्रवास करायचे. घरी परतल्यावर आम्हाला ST विषयी अनेक गोष्टी सांगायचे. अगदी आम्हीही त्या गोष्टी अनुभवल्या आहेत. साहेबांचा बाभळगावात एक ST मध्ये काढलेला फोटो आहे. तो फोटो आमच्या अगदी जवळचा आहे. साहेब त्या फोटोत खिडकीत बसले होते.” रितेशने जेनेलियाचाही ST अनुभव शेअर केला. तो म्हणाला की, “जेनेलियाचा जन्म काही लातूरचा नाही, त्यामुळे तिला कधी ST प्रवास करता आला नाही. पण, तिचा जन्म मुंबईचा आहे. त्यामुळे तिने Mumbai Best चा प्रवास केला आहे.”






