पुणे : मान्सूनच्या आगमनापूर्वीच मान्सूनपूर्व पावसानेच जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली असून, अवघ्या चौदा दिवसात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १ हजार १८३ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मावळ तालुक्यात सरासरीच्या तलुनेत सर्वाधिक पाऊस झाला असून, ही टक्केवारी तब्बल २ हजार ३४८ टक्के पाऊस झाला आहे. तर पुणे शहर परिसरात म्हणजेच हवेलीमध्ये (उपनगरात ) सरासरीच्या २ हजार ७८३ टक्के पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्याची मे महिन्याची पावसाची सरासरी ही २२.५ मि.मी. इतकी आहे. मात्र यावेळी २८ मेपर्यंतच पुणे शहरासह जिल्ह्यात सरासरी २६७ मि.मी. पाऊस पडला आहे.
पुण्यात पंधरा जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून यावेळी २६ मेला दाखल झाला. रविवारी म्हणजे २५ जून रोजी तळ कोकणात दाखल झालेला मान्सून अवघ्या २४ तासात पुण्यात दाखल झाला. पण तत्पूर्वी १० मे पासून पुणे शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तर गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात मान्सूनपूर्व अतिवृष्टीने हाहाकार निर्माण केला. बारामती, दौड, जुन्नर, मावळ तालुक्यांसह शहरी भागात बहुतांश भागात पाणीच पाणी झाले होते. मात्र रविवारपासून पावसाने मंगळवारी रात्रीपर्यंत रौद्ररुप दाखवत जिल्ह्यातील तब्बल २ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान तर केलेच. पण अनेक नागरी वस्त्यांमध्ये, गावांकडील वाड्यांमध्ये तसेच नदीकाठच्या भागात पाणी गेल्याने अनेक घरांचे नुकसान केले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराची मे महिन्यातील पावसाची सरासरी ही ३३.१ मि.मी. इतकी आहे. मात्र या वर्षी मे महिन्याच्या २८ तारखेपर्यंतच १४ दिवस पडलेल्या पावसाची २२७.३ मि.मी. इतकी नोंद झाली आहे. ही टक्केवारी सरासरीच्या तुलनेत ६८६.७ टक्के इतकी आहे.
मुळशी – ३३.१ – २३४ – १,१६६, भोर – २२.३ – १९० – ८५२, मावळ – १३.२ – ३१४ – २,३८४,
वेल्हे – २२ – १४१ – ६४२, जुन्नर – १०.३ – १८५ – १,७९८, खेड – २८.९ – २६९ – ९३१,
आंबेगाव – १५.३ – १७७ – १,१५७, शिरूर – १७.८ – ३१३ – १,७६३, बारामती – २३.८ – ३२३ – १,३६०,
दौंड – २० – २९३ – १,६३९, पुरंदर – २३.४ – १,१८१ टक्के.
Mulshi Crime News: ‘ती महिला मुळशीतील पोरांना मुली पुरवते..!’ धनश्री चौंधेंचा धक्कादायक खुलासा
मान्सूनपूर्व पावसाने शेतपिकांचे नुकसान
पुणे जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, विशेषतः नगदी पीक असलेल्या कांदा आणि उन्हाळी टोमॅटो यांना याचा मोठा फटका बसला आहे. परिणामी, बाजार समित्यांमध्ये या पिकांची आवक लक्षणीय प्रमाणात घटली आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, पारनेर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये उन्हाळी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, मे महिन्यातच काढणीच्या अवस्थेत असलेल्या या पिकांवर पावसाने घाला घातला आहे.
शेतांमध्ये पाणी साचल्याने टोमॅटोच्या मुळांना कुज येऊ लागली असून, पिकांची वाढ थांबली आहे. याशिवाय, फळांना फाटायला (क्रॅक यायला) सुरुवात झाल्याने उत्पादकतेवर थेट परिणाम झाला आहे. कांद्याच्या पिकांवरही ओलाव्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. या नुकसानामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.