राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी
मुख्यमंत्री फडणवीसांनी अहिल्यानगरमध्ये घेतली प्रचारसभा
15 तारखेला मतदान तर 16 ल निकाल जाहीर होणार
Ahilyanagar: राज्यात महानगरपालिका निवडणूक लागली आहे. अनेक ठिकाणी विविध युती, आघाडी आपल्याला दिसून येत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. अन्य पक्ष देखील जोरदार प्रचार सुरू करताना दिसून येत आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये प्रचारसभा घेतली.
अहिल्यानगरमधील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेच्या प्रचारासाठी मी आलो आहे याचा मला आनंद आहे. यापूर्वीही निवडणूक झाली होती, मात्र ती अहमदनगर महानगरपालिका निवडणूक होती. मात्र ही पहिली निवडणूक आहे की, ज्या निवडणुकीत निवडून येणारा महापौर हा अहिल्यानगरचा असणार आहे, याचा आनंद आहे. ”
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अहिल्यानगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार. पंतप्रधान मोदी यांनी शहरांसोबत गावांचा विकास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज मी आपल्या अडचणी समजून घेण्यासाठी आलो आहे. मी यायच्या आधीच तुम्ही महायुतीचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून दिले, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. अहिल्यानगची जनता आपल्यालाच निवडून देणार आहे.”
“अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 492 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देऊ. अहिल्यानगरमध्ये डीफेन्स कॉरिडॉर तयार करणार. त्यातून रोजगरनिर्मिती देखील होणार आहे. अहिल्यानगरमध्ये दररोज शुद्ध पिण्याचे पाणी आलेच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहर उत्तम करत असताना या ठिकामी यांच्या मुलांच्या हाताला काम देखील मिळाले पाहिजे.
धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार
धुळे येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे. गिरीश महाजन यांनी तीन ते चार दिवस खूप काम केले. धुळे जिल्ह्यात महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे. जी-जी आश्वासने मी दिली होती तीन पूर्ण करण्याचे काम केले.”
Maharashtra Politics: “…तर लोकशाहीचा खून झाला”; धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “सुरुवातीला कमालच झाली. सुरुवातीला तुम्ही चौकार मारला आहे. आपले लोक बिनविरोध निवडून आले तर काही लोकांना मिरची लागते. तुमको को मिरची लगी तो मे क्या करू? संसदेत खासदार बिनविरोध आलेतर लोकशाही जिवंत अन् धुळ्याच्या जनतेने चार नगसेवक बिनविरोध दिले तर लोकशाहीचा खून झाला असे म्हणणाऱ्यांचे डोके कुठे आहे ते सांगायला नको.”






