डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी पदवी अभ्यासक्रमातील आरक्षण २०% वरून १०% करण्यात आल्यानं विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी आहे. ही संख्या पुन्हा वाढवावी, अशी त्यांची मागणी आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 15 जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. याचपार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रीयेची तिसऱ्या टप्यातील प्रवेश फेरी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
नागपूरमध्ये मृत शिक्षण अधिकाऱ्याच्या बनावट सह्यांवर 580 बनावट शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आले असून, यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
निर्मला सीतारमण यांनी संसदेत २०२४-२५ च्या आर्थिक सर्वेक्षणाचा डेटा जाहीर केला. त्यात असे म्हटले आहे की ६९% शाळा सरकारी आहेत, ज्यामध्ये ५०% विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि ५१% शिक्षक कार्यरत आहेत
वाढत्या महागाईने शिक्षण घेणे सुद्धा महाग झाले आहे. पण आता टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही कारण ' या' देशांमध्ये तुम्ही घेऊ शकता क्वालिटी मेडिकल शिक्षण तेही बजेट फ्रेंडली...