• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Meditation Revolution Begins In Washim District

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिममध्ये Pyramid Spiritual Societies Movement तर्फे शहर ‘ध्यानमय’ करण्यासाठी ४० दिवसांचा मोफत ध्यान उपक्रम राबविण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 07, 2026 | 09:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाशिम शहरात आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. Pyramid Spiritual Societies Movement या सामाजिक व आध्यात्मिक संस्थेच्या वतीने शहराला ‘ध्यानमय’ करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला. या संकल्पाचा भाग म्हणून संस्थेच्या साधकांनी सलग ४० दिवस वाशिम शहरातील विविध भागांमध्ये मोफत ध्यान सत्रांचे आयोजन केले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये ध्यानाबद्दल जागरूकता वाढली असून मानसिक शांतता आणि सकारात्मकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सचिवावरील हल्ला सहन केला जाणार नाही, कारवाई न झाल्यास…, गटसचिव संघटनेचा इशारा

या ध्यान अभियानांतर्गत आययूडीपी कॉलनी, तिरुपती सिटी, लाखाळा परिसर, चांडक लेआउट, लाल बहादूर कॉलनी, शुक्रवार पेठ, हरिओम नगर, देवपेठ, गुरुवार बाजार परिसर, पुसद नाका, ग्रीन पार्क कॉलनी, विठ्ठलवाडी परिसर आणि रिद्धी-सिद्धी सोसायटी आदी अनेक भागांमध्ये ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये नागरिकांना ध्यानाची मूलभूत माहिती, त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनात ध्यान कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनेक नागरिकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांना ध्यानाच्या माध्यमातून मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करणे, सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण करणे आणि आत्मिक प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. आधुनिक जीवनशैलीत वाढत्या तणावामुळे अनेकांना मानसिक अस्वस्थता जाणवते. अशा परिस्थितीत ध्यान हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या ४० दिवसीय उपक्रमात सुमित खत्री, राधिका खत्री, संजय व्यास, रुपा व्यास, रामदेव भाटी, वर्षा भाटी, रुपेश लड्ढा, पूनम लढा, रेनू खत्री आणि भारती चांडक यांच्यासह अनेक पिरामिड साधकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यांनी विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांना ध्यानाचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांना प्रत्यक्ष ध्यान करण्याचा अनुभव दिला. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक नागरिक ध्यानाकडे आकर्षित झाले.

या ४० दिवसांच्या सातत्यपूर्ण साधना उपक्रमातून अनेक नवीन ‘पिरामिड मास्टर्स’ तयार झाले आहेत. हे साधक आता नियमितपणे ध्यान प्रशिक्षण देत समाजात जागरूकता निर्माण करत आहेत. त्यामुळे वाशिम शहरात ध्यानाची चळवळ अधिक मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी ध्यानामुळे मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांची सवय लागते, असा अनुभवही व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे वाशिम शहरात सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आयोजकांनी सांगितले. नागरिकांमध्ये मानसिक शांती, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक जाणीव वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. आता या ध्यान क्रांतीला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

या पार्श्वभूमीवर रुपेश लड्ढा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केवळ वाशिम शहरच नव्हे, तर संपूर्ण वाशिम जिल्हा ‘ध्यानमय’ करण्याचा संकल्प केला आहे. पुढील काळात जिल्ह्यातील विविध गावांमध्येही अशा प्रकारचे मोफत ध्यान सत्र आयोजित करण्याची योजना आखण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांनी ध्यानाचा स्वीकार करून मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती साधावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ध्यानाच्या माध्यमातून सकारात्मक जीवनशैली विकसित होऊन समाज अधिक संतुलित, शांत आणि प्रेरणादायी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Meditation revolution begins in washim district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim

संबंधित बातम्या

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा
1

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून
2

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

ताज्या बातम्या

पुढे वाचा
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.