महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरेल गुलाबाच्या पाकळ्यांचे गुलकंद!
प्रेमाचे प्रतीक असलेले गुलाब अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडते. प्रेम व्यक्त करण्यासाठी आवडत्या व्यक्तीला गुलाब दिले जाते. याशिवाय गुलाब आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद बनवले जाते. गुलाबाच्या पाकळ्या आणि गुळाचा वापर करून बनवलेले गुलकंद चवीला अतिशय सुंदर लागते. सुगंधी पाकळ्यांचा वापर करून गुलकंद बनवले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी गुलकंद खाण्याचा सल्ला दिला जातो. गुलकंद तुम्ही नुसतेच किंवा थंड दुधात मिक्स करून खाऊ शकता. गुलकंद केवळ चवीलाच नाहीतर महिलांच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. चला तर जाणून घेऊया गुलकंद खाण्याचे प्रभावी फायदे.(फोटो सौजन्य – pinterest)
कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले गुलकंद महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. गुलकंदामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित एक चमचा गुलकंद खावे. शरीरातील हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी गुलकंद खावे. नियमित एक चमचा गुलकंद खाल्यामुळे शरीरातील कमी झालेल्या लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.
सर्वच महिलांना महिन्याचे पाच ते सहा दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागते. पाळी आल्यानंतर कंबर दुखणे, पाठ दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गुलकंद खावे. गुलकंद खाल्यामुळे मासिक पाळीच्या वेदनांपासून लगेच आराम मिळतो. गुलकंद हार्मोन्सचं संतुलन ठेवण्यास मदत करतो. याशिवाय प्रजननाशी संबंधित अवयवांना आराम मिळवून देण्यासाठी गुलकंद खावे.
बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांवर लगेच दिसून येतो. चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांमुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी नियमित एक चमचा गुलकंद खावे. यामध्ये एसेंशियल ऑईल्स आढळून येतात, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि त्वचेची पोत चांगली राहते. गुलकंदातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म चेहऱ्यावर आलेली पुरळ कमी करण्यासाठी मदत करतात.
गुलकंद म्हणजे काय?
गुलकंद हा देशी गुलाबाच्या पाकळ्या आणि साखरेचा (किंवा खडीसाखरेचा) मिश्रण आहे, जो विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो.
गुलकंद कधी आणि कसे खावे?
गुलकंद दुधात मिसळून किंवा नुसताही खाल्ला जाऊ शकतो. उन्हाळ्यामध्ये दिवसातून दोन वेळा एक चमचा गुलकंद खाणे फायदेशीर आहे, असे हेल्थियन्सने सांगितले आहे.
गुलकंदामुळे स्मरणशक्ती सुधारते का?
गुलकंदात अँटीऑक्सिडंट्स असल्याने स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते, असे अॅग्रोवनने म्हटले आहे.