तुम्हालाही गोड पान खायला आवडत असेल तर तुम्हाला गुलकंद नक्कीच माहिती असेल. पानात गोडव्यासाठी गुलकंदाचा वापर केला जातो. गुलकंद हा गुलाबाच्या पाकळ्या, साखर आणि औषधी वनस्पतींपासून तयार केला जाणारा एक खाद्यपदार्थ आहे. याची चव गोड आणि मधुर असते. गुल म्हणजे गुलाब आणि कंद म्हणजे गोड असा याचा शाब्दिक अर्थ आहे. गुलकंदाला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते.
गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केला जाणारा हा पदार्थ फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही महत्वाची कामगिरी बजावतो. याच्या सेवनाने मेंदूचा थकवा आणि तणाव दूर होतो. याचा प्रभाव थंड असतो आणि याच्या सेवनाने मेंदूच्या मज्जातंतूंना आराम मिळतो. गुलकंद हा केवळ पानापुरता मर्यादित नसून, अनेक भारतीय पदार्थांची चव वाढविण्यासाठीही याचा वापर केला जातो.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या भुकेला द्या पूर्णविराम घरी बनवा खमंग पोहा कचोरी! झटपट तयार होते रेसिपी