(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
छत्रपती संभाजीनगरचा मराठमोळा प्रसिद्ध रिलस्टार अरूण तुपे याचे आज सकाळी निधन झाले आहे. राहत्या घरी अरूण तुपेचा मृतदेह सापडला आहे. अरूणच्या अकाली निधनामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळले आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
अरुण तुपे याने त्याच्या कॉमिक रील्स आणि रिल्स व्हिडिओंद्वारे सोशल मीडियावर जोरदार फॉलोअर्स मिळवले होते. ते अनेकदा त्यांच्या रील्सद्वारे लोकांना हसवत असत. इन्स्टाग्रामवर कोण अरूण तुपे ( kon Arun Tupe ) या नावाने त्याचे अधिकृत अकाऊंट असून त्याचे 179 K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे.
वाराणसी’ साठी ग्लोबल ब्रँड पार्टनरशिप; SKY BLUE सिनेमॅटिक्सकडे एक्सक्लूसिव राइट्स, 120 देशांमध्ये होणार रिलीज
अरूणने इन्स्टाग्रामवर 21 तासांपूर्वीच एक रील पोस्ट केली होती. जी आता त्याची शेवटची रील ठरली आहे. एवढंच नाही तर त्याने मृत्यूपूर्वी रील्सवरील कमेंट्सना उत्तर देखील दिले आहेत. अरूणच्या शेवटच्या पोस्टवर कमेंट करत चाहते शोक व्यक्त करत आहेत. अरूणला अपस्मारचा ( फिट ) त्रास होता. अशी माहिती त्याच्या नातेवाईकांकडून मिळत आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचा हृदयविकाराचा झटका येऊन झाला अशी देखील चर्चा सुरू आहे.
अरुण तुपे याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, मराठा आरक्षण नेते विनोद पाटील यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.






