कल्याण-डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून विकसित भारत अंतर्गत विविध योजनांच्या प्रचार प्रसार सुरू आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी माहिती दिली आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गटाने टीका सुरू केली आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रेच्या” दुसऱ्या टप्प्यात १५, १६ आणि १७ डिसेंबर रोजी महापालिकेतील विविध प्रभागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त डा’. इंदूराणी जाखड यांनी दिली आहे. १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते ५.३० कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदानात होणार आहे.
आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, खेलो इंडिया, पीएम उज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन (अमृत), पीएम भारतीय जन औषधी योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन इ. योजनांची माहिती देणेकरीता स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून देण्यासाठी डिजीटल स्क्रिन असणारी सुसज्य व्हॅन देखील उपलब्ध राहणार आहे. हे अभियान मोर्या नगरी आशेळे, आयरेगाव, खडेगोळवली, सेंट लॉरेन्स स्कूल उंबर्डे, गफूर डोन चौक या ठिकाणी नागरीकांनी/लाभार्थ्यांनी आवार्जुन उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
भारत अभियानांतर्गत सुरु असलेल्या प्रचारावर ठाकरे गटाकडून सडेतोड टिका
कल्याण डोंबिवली महापालिकेने केंद्र सरकारच्या विविध विकसीत भारत अभियानातंर्गत विविध योजनाचा प्रचार सुरु केला आहे. त्यावर ठाकरे गटाने भाष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण उपजिल्हा प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी सडेतोड टिका केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने स्थानिक प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे. अधिकाऱ्यांकडून जनतेचे प्रश्न सोडविले जात नाही. केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार केला जात आहे. विकसीत भारत बोलले जात आहे. भारत १९४७ सालापासून विकसीत होत गेला आहे. परंतु ठराविक लोकांची आणि पक्षांच्या जाहिराती करणे महापालिकेची अशीच काय आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामे करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. शासनाने शासनाचे काम करावे. महापालिकेने महापालिकेचे काम करावे.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation kdmc commissioner dr indurani jakhar thackeray group shivsena maharashtra government