'ड्रोन' आरोग्यसेवेचा नवा नायक ! मुंबई आयटीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रयोग, या भागातही सेवा
सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत मिळणार आहे. डोंगर, दऱ्या ओलांडत हा नायक भरारीस सज्ज आहे.या भागात आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशासनाला अनंत अडचणी येतात. यातच आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांवर लसी आणि औषधसाठा पोचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागते. नर्मदा बॅक वाटर परिसरात गावपाडांना एकतर होळीच्या साह्याने प्रवास करावा लागतो तर दुसरीकडे अनेक गावपाड्यांना रस्ते नसल्याने कर्मचाऱ्यांना २० किलोमीटरची पायपीट करावी लागत असते. मात्र आता मुंबई आयटी आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना औषध साठा पोचवण्यासाठी ड्रोनची मदत मिळणार आहे. त्यासाठी लागणारी सर्वच तयारी पूर्ण झाली असून पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.
Samsung आणि Startup India यांच्यात सामंजस्य करार, भारतातील तरूण इनोव्हेटर्सना सक्षम करण्याचा उद्देश
नर्मदा काठावरील दुर्गम भागातीलआजही अनेक गावांना जाण्यासाठी रस्ता नाही. आरोग्य सेवा पोहोचवणं हे इथं नेहमीच मोठे आव्हान राहिलं आहे. बिलगाव आरोग्य केंद्र ते सावऱ्या दिगर यांसारख्या गावांमध्ये जाण्यासाठी लोकांना होडी किंवा बार्जचा प्रवास करावा लागतो. आरोग्य कर्मचारीही अनेकदा 20 किलोमीटरहून अधिक पायपीट करत लस आणि औषधं घेऊन जातात, ज्यात 4 तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे लसींच्या योग्य तापमानावर परिणाम होऊन त्या खराब होण्याची भीती असते. याच समस्येवर उपाय म्हणून, जिल्हा प्रशासन आणि मुंबई आयआयटीने एक महत्त्वाकांक्षी ड्रोनद्वारे मेडिसिन आणि लसींचा पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी झाला अजून दुर्गम भागातील या दोन आरोग्य केंद्रांवर च्या माध्यमातून औषध साठा पोचविण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या ड्रोन मिशन अंतर्गत गडचिरोली आणि नंदुरबार या दुर्गम भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी ड्रोन मिशन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई आयटीच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात असून त्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले दोन किलो आणि दहा किलो वजन होण्याच्या कॅपॅसिटी चे ड्रोन्स आरोग्य विभागाला मिळणार असून यासाठी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे हे दोन मिळाल्यानंतर दुर्गम भागातील गर्वधर मातांना पोषण आहार आणि औषध औषध साठा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था होईल त्यामुळे दुर्गम भागातील आरोग्यवस्था असेल तर असा आशावाद नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
Safer Internet India आणि META एकत्र, ऑनलाइन फसवणूक व घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी केली पार्टनरशिप
आमच्या टीमने हा डिलिव्हरी ड्रोन बनवला असून त्याची वजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी दोन किलो असून चार किलोमीटर अंतरावर औषधसाठा पोहोचण्यासाठी दहा मिनिटे वेळ लागतो. या संशोधनासाठी राज्य शासनाने आर्थिक मदत केली आहे. मोबाईल फोनच्या नेटवर्कने ड्रोनला कंट्रोल करता येणार आहे. त्यासोबतच कॅमेरा असल्याने परिसरातील परिस्थिती संबंधित आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना समजणार आहे. एकूणच आरोग्य केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मार्फत है ड्रोन हैंडल केले जाणार असून यामुळे या परिसरातील रुग्णांना वेळेवर औषध साठा उपलब्ध होण्यास मदत होईल.
विद्यार्थी मुंबई आयटी