नंदुरबार आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना
नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकअप टॅम्पो उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघाताच्या सहा जणांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती हाती लागली आहे. या पिकअप टेम्पोमध्ये १५ हुन अधिक प्रवासी प्रवास करीत होते. जखमींची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींमधील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण पिकअप टॅम्पोमधून अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश होता.
दुसरी घटना
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव ते जउळका रेल्वे दरम्यानच्या समृद्धी महामार्गावरील डव्हा पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला. मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव असलेली कार थेट डिव्हायडरवर जाऊन आढळली. यात म्यानमार या देशातील 6 जणांच्या एकाच कुटुंबातील 40 वर्षीय वडील आणि 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. 63 वर्षीय आजोबा गंभीर जखमी आहेत. तर आई, मावशी, मामा आणि चालक असे ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त कारमधील कुटुंब हे मुंबईवरून जगनाथ पुरी येथे जात असल्याची माहिती आहे. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे
गोमांस विक्रीवरून दोन गट आमने-सामने, बजरंग दल कार्यकर्त्याला मारहाण; तणाव वाढला
अकोला शहरात दोन गट आमने-सामने आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी एका गोमास विक्री करणाऱ्या एका दुकानावर धाड टाकली. यानंतर मोठा गोंधळ उडाला. दोन गट आमने- सामने आले आणि त्यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास पोलिसांनी बैदपुरा येथील गोमास विक्रीच्या संशयित दुकानावर छापा टाकला. या कारवाईनंतर परिसरात दोन गट जमा झाले आणि त्यांच्यात तणाव वाढला. या गोंधळात बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच , दुसर्या गटाकडून दगडफेक करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस जेव्हा घटनास्थळी गेले, तेव्हा पोलिसांना मारहाण झाल्याचा दावा केला गेला होता. दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांनी हा दावा खोडून काढला असून, पोलिसांवर कोणताही हल्ला झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेत बजरंग दलाचा एक गोरक्षक किरकोळ जखमी झाला असून, त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पदाचा माज? शिरुर तालुक्यात उपसरपंचाकडून महिलेला मारहाण; कारण काय तर…