नंदुरबार हिल्यातील तळोदा तालुक्यातील ढवळीविहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.
पालकांनी मोबाईल घेऊन न दिल्याने तरुण नैराश्येत; गळफास घेऊन संपवलं जीवन
नेमकं काय घडलं?
रोझवा प्लॉटमध्ये एका व्यक्तीने निधन झाले होते. परंतु, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यामुळे मृतदेह घेऊन नेण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे, गावकऱ्यांनी तब्बल दोन तास पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहिली. परंतु, काही फायदा न झाल्याने अखेर मृतदेहाला दोराच्या साह्याने वाहत्या पाण्यातून नेण्यात आले.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वेळा वर्षानुवर्षे प्रशासनाकडे पूल उभारणीसाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून आदिवासींच्या जीवाला काही मोल आहे की नाही?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. आदिवासी समाजाला मरणानंतर देखील संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव या घटनेमुळे पुन्हा एकदा सामोर आले आहे.
शहरात वाढतेय गुन्हेगारी प्रवृत्ती; मटका जुगारावरील छाप्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर
कणकवली येथील मटका अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः धाड टाकल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर कारवाई करत आहेत. दिवसेंदिवस शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याचं निदर्शनास येत होतं. याचपार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून जिल्ह्यातील सर्व मटका जुगार अड्डे थांबवले गेले आहेत.दर दिवशी होणारा लाखो रुपयांचा चुराडा या कारवाईमुळे थांबविला गेला आहे. कणकवलीचे पोलीस निरीक्षक यांचे या प्रकरणात झालेले निलंबन जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात जिल्ह्यात पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. या प्रकरणातील संशयित गुन्हेगारांचे अटक सत्र सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील दारू मटका जुगार या अवैध धंद्यांवर पोलीस दलाने छापेमारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. कणकवलीमधील घेवारी यांच्या मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांनी घातलेली धाड जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी दिशा देणारी ठरली आहे. बेकायदेशीर दारू,मटका जुगार, चरस गांजा अशा नशेली पदार्थांच्या रॉकेटमुळे सिंधुदुर्गची भावी पिढी बरबाद होता नये यावर पोलिसांनी अंकुश ठेवावा असे स्पष्ट आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दिले होते. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा बेकायदेशीर कृत्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे व भावी पिढीचे त्यात मोठे नुकसान होत आहे. याबाबत गांभीर्याने घ्यावे असे स्पष्ट निर्देशाने दिले होते. आता पोलिसांनी जिल्ह्यातील असे बेकायदेशीर अड्डे व ते चालवणारे नेटवर्क मोडण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर छापेमारी सुरू केली आहे.
अमरावतीच्या बडनेरात धारदार शस्त्राने वार करून लिपिकाची हत्या; रस्त्यावर फेकून दिला मृतदेह अन्…