• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • There Has Been An Incident Of Chaos Outside A Polling Station In Pimpri Gurav Pune District

PCMC Election 2026 : पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन

पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 15, 2026 | 01:24 PM
पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ
  • निवडणूक अधिकाऱ्यांवर संताप
  • अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन
पिंपरी : महाराष्ट्रात आज सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज मतदान पार पडल्यानंतर उद्या निकाल जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. कोणता पक्ष किती जागा जिंकणार हे चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे. आज मतदानासाठी केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा आहेत. पिंपरी गुरव येथील प्रभाग क्रमांक २९ मधील कल्पतरू सोसायटीच्या मतदान केंद्रावर मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.

महिला उमेदवाराचे पती राहुल जवळकर यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) यांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदार याद्यांमध्ये गंभीर घोळ असून, बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोग आणि पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही आंदोलकांकडून करण्यात आला आहे.

या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. घटनेबाबत निवडणूक प्रशासनाकडून पुढील चौकशी व आवश्यक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन वाद

पुणे महापालिका संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांची मोठी गर्दी झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मतदान करण्यासाठी पिंपरीमध्ये मतदारांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केंद्रामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल, पर्स, पिशवी असे सामान घेऊन जाण्यास मनाई आहे. यासाठी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून मोबाईल घेऊन जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. मात्र याच कारणावरुन पिंपरी चिंचवडमधील काही मतदार केंद्राबाहेर वाद झाल्याचे देखील दिसून आले आहे. पिंपरी चिंचवडमधील काही भागांमध्ये मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी द्यावी असे काही जणांनी सांगितले. यासाठी त्यांची केंद्रावरील कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. यामुळे अनेक केंद्राबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले आहे.

Web Title: There has been an incident of chaos outside a polling station in pimpri gurav pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PCMC Election 2026
  • Pimpri News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhurandhar: 10 दिवसांत 15.8 मिलियन व्ह्यूज, 11 देशांमध्ये नंबर 1 चित्रपट; थिएटरनंतर आता ओटीटीवर वर्चस्व

Dhurandhar: 10 दिवसांत 15.8 मिलियन व्ह्यूज, 11 देशांमध्ये नंबर 1 चित्रपट; थिएटरनंतर आता ओटीटीवर वर्चस्व

Feb 12, 2026 | 12:51 PM
केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

केंद्रात अन् राज्यात ‘हिरो’, बारामतीत मात्र ‘झिरो’; स्थानिक निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Feb 12, 2026 | 12:45 PM
‘Devkhel’मध्ये अंकुश चौधरीची निवड का ठरली खास? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी केला खुलासा

‘Devkhel’मध्ये अंकुश चौधरीची निवड का ठरली खास? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी केला खुलासा

Feb 12, 2026 | 12:42 PM
प्रियंका चोप्रा बनणार ‘Bond Girl’? कास्टिंगबाबत दिला मोठा इशारा; चाहत्यांमध्ये उत्साह

प्रियंका चोप्रा बनणार ‘Bond Girl’? कास्टिंगबाबत दिला मोठा इशारा; चाहत्यांमध्ये उत्साह

Feb 12, 2026 | 12:18 PM
Mumbai: भायखळ्यात  १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

Mumbai: भायखळ्यात १८ मजली इमारतीची लिफ्ट कोसळली; ५ जण गंभीर जखमी

Feb 12, 2026 | 12:12 PM
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मितीवर भर,  मुख्यमंत्र्यांची माधवानी समूहाला भेट

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात उत्पादन वाढ आणि रोजगार निर्मितीवर भर, मुख्यमंत्र्यांची माधवानी समूहाला भेट

Feb 12, 2026 | 12:11 PM
IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…

IND vs PAK : 15 फेब्रुवारीपूर्वी भारताला गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हटवण्याची संधी! जर असे झाले तर…

Feb 12, 2026 | 12:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.