आमदार संजय गायकवाड यांना शिळे अन्न देणाऱ्या आमदार निवासमधील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Gaikwad canteen license cancelled : मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी कॅन्टीन चालकाला जोरदार मारहाण केली. यामध्ये संजय गायकवाड यांना शिळे अन्न दिल्यामुळे त्यांना राग अनावर झाला. संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जोरदार मारहाण केली असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी यावरुन जोरदार टीका केल्यानंतर देखील आमदार संजय गायकवाड यांना कोणताही पश्चत्ताप नसल्याचे दिसून आले आहे. आता सदर कॅन्टीनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून परवाना रद्द करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आकाशवाणी आमदार निवास येथे मुक्कामास होते. कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला कृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. सलग एका मागून एक बुक्क्या देखील मारल्या. या प्रकरणावरुन आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. यावरुन विधीमंडळामध्ये देखील आवाज उठवण्यात आला. संजय गायकवाड यांनी टॉवेल आणि बनियानवर बाहेर येत कॅन्टीन चालकाला जाब विचारला. याचबरोबर त्यांनी खराब झालेल्या डाळेचा त्यांना वास देखील घ्यायला लावला. यानंतर एका मागोमाग एक बुक्क्या संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांना मारल्या. त्यामुळे संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली जात असून याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र कॅन्टीनवर कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आकाशवाणीमधील या कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टिन चालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी सदर कॅन्टीनचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार संजय गायकवाड यांना शिळे अन्न दिल्यानंतर त्यांनी कारवाईची मागणी केली होती. या कॅन्टीनमधील अन्नाचे नमुने हे चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.