संजय गायकवाडांवर शिंदेंची प्रतिक्रिया (फोटो -ani)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे चर्चेत आले आहेत. संजय गायकवाड हे यांनी त्यांना मिळालेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरुन आकाशवाणी आमदार निवासामध्ये जोरदार धुमाकूळ घातला. काल (दि.08) रात्री झालेल्या या प्रकारानंतर त्यांचा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावरुन त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.दरम्यान आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
आमदार संजय गायकवाड हे आमदार निवासात असताना जेवण केले होते. नित्कृष्ठ जेवणाचा त्रास सर्वाना होऊ शकतो. मात्र ते खाल्ल्याने त्यांना उलटी झाली. त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केले. अशा प्रकरणावर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. कोणालाही मारहाण करणे योग्य नाही आहे. मी स्वतः संजय गायकवाड यांना समज दिली आहे.
संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केली आहे. संजय गायकवाड हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. आता गायकवाड यांनी मारहाण केली असून याचा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झाला आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या आमदार निवासमध्ये शिळे आणि निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्यामुळे संजय गायकवाड यांचा संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी बनियनवर बाहेर येत कॅन्टीन चालकाला मारहाण केली आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळामध्ये वाद निर्माण झाला आहे.
बनियानवर आले थेट लगावली कानशिलात; संजय गायकवाड यांचा कॅन्टीन चालकाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काल (दि.08) रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. कॅन्टीन चालकाला त्यांनी बोलावून घेत दिलेल्या अन्नाचा वास घेण्यास सांगितले. अन्न खराब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कॅन्टीन चालकाला जाब विचारला. मात्र त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाच्या थेट कानशिलात लगावली. याचबरोबर त्यांनी आमदार निवास मधील व्यवस्थापनाला देखील जाब विचारला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, आकाशवाणी मुंबई आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ते असलेल्या रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र जेवणात देण्यात आलेलं वरण आणि भात हे शिळ होतं व त्याचा वास येत होता असा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी केला. कॅन्टीन चालकांला त्यांनी वास देखील घ्यायला लावलायापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड सांगितलंतसेच कोणीही जेवणाचं बील देऊ नये , मी विधीमंडळाच्या सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचे देखील संजय गायकवाड म्हणाले आहेत.