संग्रहित फोटो
तासगाव : तासगाव शहरातील एका वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित रजनीकांत भाऊसाहेब देवकुळे (वय ४३) याच्याविरोधात तासगाव पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल दिली आहे. संशयित देवकुळे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला २० तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
संशयित देवकुळे हा शहरातील एका खासगी शाळेचा संस्थाचालक आहे. संबंधित तरुणीशी संशयिताची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने तरुणीवर अत्याचार केला. संशयित रजनीकांत याने शाळा व घरी गेल्या सात महिन्यांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे.
गेल्या काही दिवसात मुलीला शारीरिक त्रास सुरू झाला. तिच्या आईने पीडित मुलीला डॉक्टरांना दाखवले असता ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत पीडित तरुणीच्या आईने संशयित रजनीकांत देवकुळे याच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवकुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विनय गोडसे अधिक तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : रिक्षाचालकाने रिक्षातील प्रवाशालाच लुटलं; जिवे मारण्याची धमकी दिली अन्…
राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
8 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात 65 वर्षीय नराधमाने एका तीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. अशातच दर्यापूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक घटना एका गावात 18 जानेवारी रोजी उघडकीस आली आहे. यामध्ये 13 वर्षीय मुलाने 8 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे.