फोटो सौजन्य - सोशल मीडिया
गोवा : गोवा म्हटलं की समोर येतात समुद्रकिनारे, क्लब, नाईट पार्टी, क्रूझ. आजच्या तरुण वर्गाला सर्वात जास्त भुरळ आहे ती तिथल्या पार्टी कल्चरची. साधारणतः उन्हाळा आणि हिवाळा ऋतूत लोक गोव्याला फिरायला जातात. पण, गोवा पावसाळ्यात सुद्धा स्वर्गाहून सुंदर दिसतो. हे क्वचितच लोकांना माहित आहे. मान्सूनमध्ये गोवा हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. गोव्यात समुद्रकिनाऱ्या सोबतच चर्च, मंदिरं, ऐतिहासिक वास्तू, तसेच तेथील खाद्यसंस्कृती या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो. देश विदेशातील अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात.
पावसाळ्यातील समुद्रकिनारे
गोव्यामध्ये पर्यटकांना प्रमुख आकर्षण हे समुद्रकिनाऱ्यांचे आहे. समुद्र खवळलेला असल्याने पावसाळ्यात बऱ्याचवेळा समुद्रावर जायला परवानगी नसते. पण जेव्हा वातावरण ठीक असेल आणि तुम्हाला उसळत्या आणि खळखळत्या लाटांचा आवाज आवडत असेल तर तुम्ही पावसाळ्यात सुद्धा समुद्रकिनारचे नयनरम्य दृश्य पाहू शकता.
ऑफ सीझनचा घेता येईल फायदा
गोव्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र ही संख्या पावसाळ्यामध्ये कमी होती. ही वेळ गोवा फिरण्यासाठी आणि तिथले नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. पावसाळ्यात गोव्याला जायचा फायदा असा कि ऑफ सीझन असल्यामुळे पर्यटक कमी असतात. त्यामुळे हॉटेल्स बुकिंगचे रेट पण कमी असतात. तुम्हाला बजेट फ्रेंडली ट्रिप हवी असेल तर नक्की गोव्याला भेट देऊ शकता. पावसाळ्यातील गोवा ट्रीप तुमच्या खिशाला कात्री लावणार नाही हे नक्की.
गोव्याची संस्कृती
गोव्याला समृद्ध असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. गोव्यात अनेक सण आणि उत्सव आनंदात साजरे केले जातात. पर्यटकांना त्यांचे खास आकर्षण आहे. पावसाळ्यातसुद्धा गोवन संगीत,नृत्य आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. गोव्यामधील छोटी छोटी सुंदर गावं सुद्धा पावसाळ्यात पाहण्यासारखी आहेत. पावसाळ्यामध्ये गोव्याचं सौंदर्य आणखी बहरते. त्यामुळे हे नेत्रदीपक सुख तुम्ही पावसाळ्यातील ट्रीपमध्ये अनुभवू शकता. हा तुमचा अनुभव इतरांच्या गोवा ट्रीपपेक्षा अधिक वेगळा असेल.
दूधसागर धबधबा
देशातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या धबाधब्यांमध्ये दूधसागर धबधब्याचे नाव आवर्जुन घेतले. पावसाळ्यामध्ये गोव्याला गेलात तर तुमच्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये दूधसागरचा समावेश आवश्य करावा. गोव्याला पावसाळ्यात जाताना लागतो सर्वात सुंदर असा दूधसागर धबधबा. तसेच हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. दूधसागर धबधबा हा ३९० मीटर उंचीवरून खाली पडतो. या धबधब्याचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल तर इथे ट्रेकिंग करूनही जाता येतं. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी तर हा धबधबा म्हणजे ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशा पद्धतीने गौव्याच्या ट्रीप प्लॅन केली तर नक्कीच तुमच्या अनुभवाच्या शिदोरीमध्ये अविस्मरणीय अशा आठवणींची गर्दी होईल.