आजकाल लोक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी महामार्गाचा मार्ग अवलंबवतअसतात. हा लांब आणि रुंद रस्ता वाहन चालवण्यासाठी तर उत्तम आहेच, पण ट्रॅफिक जाम टाळण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, महामार्गावर वाहन चालवणे सोपे नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. महामार्ग अनेकदा शहराबाहेर असल्याने कोणत्याही प्रकारच्या घटनेच्या वेळी लोकांना मदत मिळणे कठीण होऊन बसते.
विशेषत: हायवेवर गाडी चालवताना पेट्रोल संपलं की काय करायचं याचं टेन्शन लोकांना पडतं. मात्र चिंता करून नका, कारण आज आम्ही तुम्हाला हायवेवर गाडी बंद पडल्यास कोणत्या सुविधा दिल्या जातात याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. या सुविधा NHAI कडून हायवेवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला मोफत दिल्या जातात. म्हणजेच या सुविधांसाठी तुम्हाला कोणताही एक्सट्रा चार्ज भरावा लागणार नाही.
हेदेखील वाचा – प्रभू रामाने जिथे केले दशरथांचे पिंडदान! भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत श्राद्ध-पिंड दानासाठी प्रसिद्ध, इथे पूर्वजांना मिळतो मोक्ष
हायवेवर गाडी चालवताना तुमचे पेट्रोल संपले तर तुम्हाला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही शेवटचा कोणता टोल प्लाझा ओलांडला फक्त हे लक्षात ठेवा. टोल स्लिपच्या तळाशी आपत्कालीन क्रमांक दिला जातो. तुम्ही या नंबरवर ताबडतोब कॉल केल्यास 15 मिनिटांत तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, विशेष म्हणजे तुम्हाला या सर्व्हिससाठी कोणतेही अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाही. याशिवाय 1033 वर कॉल करून तुम्ही 5 ते 10 लिटर पेट्रोलची ऑर्डर देऊ शकता. सेवेसाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु तुमच्याकडून पेट्रोलची किंमत मात्र आकारली जाईल.
हायवेवर सतत गाडी चालवताना थकवा आला तर रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यावर तुम्ही आराम करू शकता. यासाठी तुम्हाला कोणीही नकार देणार नाही आणि कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय पाणी आणि शौचालयाची सुविधाही तुम्ही मोफत घेऊ शकता.
हेदेखील वाचा – जिथे पांडवांची सर्व पापं नष्ट झाली, भारतातील प्राचीन शिवमंदिर, रंजक आख्यायिका, ऑक्टोबरमध्ये करा प्लॅन!
प्रवासादरम्यान तुम्ही गाडी खराब झाली तर काळजी करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीतही तुम्ही 1033 क्रमांकावर कॉल करून मेकॅनिक आणि क्रेनला कॉल करू शकता. मेकॅनिकला कॉल करण्याची सुविधा मोफत आहे. पण गाडी दुरुस्त करण्यासाठी त्याला काही पैसे द्यावे लागतात. समस्येचे त्वरित निराकरण करणे शक्य नसल्यास, वाहन क्रेनद्वारे उचलले जाते आणि जवळच्या सेवा केंद्रात नेले जाते.
काही वेळा नॅशनल महामार्गावर मोबाईल सिग्नल मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेकवेळा एखाद्याला कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. तुम्ही कधीही आपत्कालीन परिस्थितीत अडकल्यास, तुम्ही टोलपर्यंत पोहोचू शकता आणि आपत्कालीन टोल बूथचा वापर करू शकता.
नॅशनल महामार्गावर तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्या लोकांचे आरोग्य बिघडल्यास किंवा वैद्यकीय परिस्थितीती उद्भवल्यास, तुम्ही वैद्यकीय आपत्कालीन फोन नंबरवर कॉल करू शकता. NHAI द्वारे प्रदान केलेले ऍम्ब्युलन्स क्रमांक 8577051000 आणि 7237999911 आहेत. यांचा वापर करून काही क्षणातच घटनास्थळी ऍम्ब्युलन्स बोलावू शकता. या क्रमांकांवर कॉल करताच 10 मिनिटांत ऍम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचते. किरकोळ वैद्यकीय गरज भासल्यास ते त्वरित केले जाते, अन्यथा ऍम्ब्युलन्स तुम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाते. ऍम्ब्युलन्स सुविधादेखील तुम्हाला मोफत दिली जाते.
प्रवासादरम्यान आपल्याला तणावाचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व टोलनाक्यांवर ऍम्ब्युलन्स , रिकव्हरी गाडी आणि सुरक्षा पथके ठेवण्यात आली आहेत. सर्वसाधारणपणे लोकांना याची माहिती नसते. परंतु प्रवाशांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी करण्यासाठी या सुविधा पुरवल्या जातात.