आपला भारत देश अनेक निसर्गमय आणि सुंदर ठिकाणांची समृद्ध आहे. भारतातील अनेक पर्यटन ठिकाणे ही जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. आपला देश जगभरातील अनेक सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. इथे समुद्रकिनाऱ्यांपासून ते डोंगरदऱ्यांपर्यंत सर्वच गोष्टी पाहायला मिळतात. मात्र तुम्हाला माहित का? देशात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाण्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात जास्त भीतीदायक म्हणजेच हॉरर ठिकाणांची माहिती सांगणार आहोत. हे ठिकाणे इतकी भयाण वाटतात की लोक याजागी जाण्याचा विचारही करत नाहीत.
तुम्ही साहसी आणि धाडसी असाल तसेच तुम्हाला काही नवीन एक्सप्लोर करायचे असेल तर तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. असे म्हटले जाते की या ठिकाणी भूत-प्रेतांचा वास आहे. चला तर मग भारतातील या ठिकाणांविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
कॅसुअलीम गावातील थ्री किंग्स चर्च हे गोव्यातील सर्वात लोकप्रिय हॉरर ठिकाणांपैकी एक आहे. अनेकांनी या ठिकाणी काही असामान्य घटना घडताना पाहिल्या आहेत. असे म्हणतात की, पूर्वीच्या काली तीन महाराजांनी चर्चच्या मालमत्तेसाठी लढा दिला आणि एकमेकांना ठार मारले आणि तेव्हापासूनच त्यांच्या आत्मा या चर्चमध्ये भटकू लागल्या.
हे ठिकाण भीतीदायक कथांसाठी ओळखले जाते. या ग्रंथालयाच्या नूतनीकरणादरम्यान एक अपघात झाला. या अपघातातएकूण 12 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ही जागा भुतांची जागा समजली जाते. एवढेच काय तर, सुरक्षा रक्षकही येथे नाईट ड्युटी करण्यास तयार नसतात.
रामोजी फिल्म सिटी जगातील सर्वात मोठे फिल्म स्टुडिओ आहे मात्र या ठिकाणी पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी होत असल्याचे सांगितले जाते. अनेक जणांनी या जागी अशा घटनांचा अनुभव घेतला आहे. इथे अनेक लोकांना काही विचित्र गोष्टी झालेल्या जाणवल्या आहेत.
नवी दिल्लीमधील बहादूरशाह जफर रोडवर असलेला फिरोजशाह कोटला किल्लादेखील जिनद्वारे पछाडलेले आहे असे म्हटले जाते. या किल्ल्यावरील रात्रीचे वातावरण हे अतिशय भितीदायक असते.