आता फक्त 6 हजार रुपयांत शिर्डी दर्शन करता येणार
महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय धार्मिक स्थळे आहेत. या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी दरवर्षी इथे हजारो पर्यटक दूर राज्यातून येत असतात. या स्थळांपैकीच एक श्रद्धास्थान आहे शिर्डी. शिर्डीला साईबाबांची समाधी असून इथे त्यांचे भव्य मंदिरदेखील आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रांपैकी शिर्डी एक आहे. शिर्डीला भेट देण्यासाठी दरवर्षी इथे लाखो भाविक येत असतात. शिर्डीपासून काही अंतरावर शनि शिंगणापूर आहे, जिथे शनिदेवांचे मोठे मंदिर आहे.
आता तुम्हालाही शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घ्यायचे असेल तर अवघ्या 6 हजार रुपयांत प्रवास करता येणार आहे. भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. यानुसार आता फक्त 6 हजारात तुमचा शिर्डी प्रवास पूर्ण होणार आहे. जाणून घेऊयात याविषयी सविस्तर.
भारतीय रेल्वेने (IRCTC) स्वस्त टूर पॅकेज लाँच करत प्रवाशांना कमी दरात विविध पर्यटन ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. यातच IRCTC ने शिर्डीचेही काही स्वस्त टूर पॅकेज आणले आहेत. यानुसार आता प्रवाशांना कमी बजेटमध्ये सर्व सोयी-सुविधांसह शिर्डीचा प्रवास करता येणार आहे. IRCTC चे टूर पॅकेज ‘देखो अपना देश’ अंतर्गत शिर्डी रेल्वे टूर पॅकेजमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
हे शिर्डी टूर पॅकेज 3 रात्री 4 दिवसांचे असणार आहे. ज्यामध्ये प्रवाशांना शिर्डी तसेच शिंगणापूर येथे दर्शनाची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला ट्रेनच्या स्लीपर क्लास, स्टँडर्ड क्लास आणि 3 एसी मध्ये प्रवास करण्याचा पर्याय मिळणार आहे.
Explore the divine aura of Shirdi, the spiritual essence of Nashik, and the sacred vibes of Trimbakeshwar on this 3-night, 4-day pilgrimage. Perfect for those seeking solace and spiritual enlightenment.
Destinations Covered: #Shirdi, #Nashik, #Trimbakeshwar
Departure Frequency:… pic.twitter.com/eGUdnyv2eZ
— IRCTC (@IRCTCofficial) July 3, 2024